S M L

जे.डे हत्येप्रकरणी संशयिताचे स्केच जारी

13 जूनज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या मारेकर्‍याचे स्केच गुन्हे शाखेनं जारी केले आहे. एका 20 - 25 वर्षांच्या तरुणाचं स्केच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय. शिवाय मारेकर्‍यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची एक टीम कोलकात्याला रवाना करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीवरून हे रेखाचित्र जारी करण्यात आलं आहे. जे. डे यांचे मारेकरी प्रोफेशनल असल्याचं पोलीसांनी सांगितले आहे. दोन दुचाकीवरून 4 जणांनी येऊन जे. डे यांची हत्या केली. दोन जणांनी मागच्या बाजूनं आणि दोन जणांनी पुढच्या दिशेने येऊन जे. डे यांच्यावर गोळ्या छाडल्या होत्या. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी जे. डेंनी गेल्या महिन्याभरात ज्या ज्या स्टेारीज केलेल्या आहेत. त्यावरून काय सुगावा लागतोय का हे तपासण्याचे काम हाती घेतलं आहे. पोलिसांनी जे. डे यांचा लॅपटॉप, टेलिफोन, मोबाईल, हार्डडीस्क ताब्यात घेतली आहे. त्यावरून त्यांना आलेल्या फोन-एसएमएसचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे. शिवाय जे. डे यांनी आपल्या शेवटच्या कामाचे जे कुरिअर केलं होतं ते कुरिअर कंपनीकडून मागवण्यात आलंय. आतापर्यंत या प्रकरणी 15 ते 20 जणांची चौकशी केरण्यात आली असून त्यात गँगस्टर, तेलमाफिया आणि खबरींचा समावेश आहे. या मारेक-यांचा छडा लावण्यासाठी 4 ते 5 क्राईम ब्रांच युनिट काम करत असून त्यात 70-80 अधिकारी-कर्मचारी आहेत. आतापर्यंत पोलिसांनी सद्रू नावाच्या तेलमाफियाची चौकशी केली आहे. शिवाय सध्या जेलमध्ये असलेल्या मोहम्मद अलीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 01:42 PM IST

जे.डे हत्येप्रकरणी संशयिताचे स्केच जारी

13 जून

ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या मारेकर्‍याचे स्केच गुन्हे शाखेनं जारी केले आहे. एका 20 - 25 वर्षांच्या तरुणाचं स्केच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय. शिवाय मारेकर्‍यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेची एक टीम कोलकात्याला रवाना करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीवरून हे रेखाचित्र जारी करण्यात आलं आहे. जे. डे यांचे मारेकरी प्रोफेशनल असल्याचं पोलीसांनी सांगितले आहे. दोन दुचाकीवरून 4 जणांनी येऊन जे. डे यांची हत्या केली. दोन जणांनी मागच्या बाजूनं आणि दोन जणांनी पुढच्या दिशेने येऊन जे. डे यांच्यावर गोळ्या छाडल्या होत्या. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी जे. डेंनी गेल्या महिन्याभरात ज्या ज्या स्टेारीज केलेल्या आहेत.

त्यावरून काय सुगावा लागतोय का हे तपासण्याचे काम हाती घेतलं आहे. पोलिसांनी जे. डे यांचा लॅपटॉप, टेलिफोन, मोबाईल, हार्डडीस्क ताब्यात घेतली आहे. त्यावरून त्यांना आलेल्या फोन-एसएमएसचा रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू आहे. शिवाय जे. डे यांनी आपल्या शेवटच्या कामाचे जे कुरिअर केलं होतं ते कुरिअर कंपनीकडून मागवण्यात आलंय.

आतापर्यंत या प्रकरणी 15 ते 20 जणांची चौकशी केरण्यात आली असून त्यात गँगस्टर, तेलमाफिया आणि खबरींचा समावेश आहे. या मारेक-यांचा छडा लावण्यासाठी 4 ते 5 क्राईम ब्रांच युनिट काम करत असून त्यात 70-80 अधिकारी-कर्मचारी आहेत. आतापर्यंत पोलिसांनी सद्रू नावाच्या तेलमाफियाची चौकशी केली आहे. शिवाय सध्या जेलमध्ये असलेल्या मोहम्मद अलीचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close