S M L

कोकणात मृगाचे किडे ; पाऊसाची चाहूल

13 जूनपहिल्या पावसातच कोकणात अनेक ठिकाणी दरडी आणि डोंगर खचले असले तरी बळीराजाच्या कामांना वेग आला आहे. शेताशेतात मृगाचे लालबुंद किडे आणि यंदाचे शेत चांगले येऊ दे यासाठी गार्‍हाणं घालत दरवर्षीप्रमाणे दिली जाणारी कोंबड्याची राखण असं दृष्य सध्या कोकणातल्या शेताशेतात आहे. शेतात दिसणा-या या लालबुंद सुंदर किड्यांना मृगाचे किडे म्हटलं जातं. हे किडे दिसले की मृग नक्षत्रात पाऊस भरपूर लागणार अशी शेतकर्‍यांची खात्री होते. आणि मग कोंबड्याची राखण दिली जाते. नैसर्गिक आपत्तीपासून घरादाराची शेताभाताची रखवाली धरणार्‍या कोंबड्याचा बळी देऊ न कोकणातला शेतकरी शेतीला सुरुवात करतो. वर्षांनूवर्षापासून सुरू असलेली ही परंपरा कोकणात आजही जपली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 03:32 PM IST

कोकणात मृगाचे किडे ; पाऊसाची चाहूल

13 जून

पहिल्या पावसातच कोकणात अनेक ठिकाणी दरडी आणि डोंगर खचले असले तरी बळीराजाच्या कामांना वेग आला आहे. शेताशेतात मृगाचे लालबुंद किडे आणि यंदाचे शेत चांगले येऊ दे यासाठी गार्‍हाणं घालत दरवर्षीप्रमाणे दिली जाणारी कोंबड्याची राखण असं दृष्य सध्या कोकणातल्या शेताशेतात आहे.

शेतात दिसणा-या या लालबुंद सुंदर किड्यांना मृगाचे किडे म्हटलं जातं. हे किडे दिसले की मृग नक्षत्रात पाऊस भरपूर लागणार अशी शेतकर्‍यांची खात्री होते. आणि मग कोंबड्याची राखण दिली जाते. नैसर्गिक आपत्तीपासून घरादाराची शेताभाताची रखवाली धरणार्‍या कोंबड्याचा बळी देऊ न कोकणातला शेतकरी शेतीला सुरुवात करतो. वर्षांनूवर्षापासून सुरू असलेली ही परंपरा कोकणात आजही जपली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close