S M L

संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण तर लोकपाल बैठकीचं का नाही !

13 जूनलोकपाल बिलाबाबत सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.प्रणव मुखर्जी यांनी रविवारी अण्णा आणि त्यांच्या टीमवर जोरदार टीका केली होती. आज अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भुषण यांनी सरकारवर हल्लाबोल केला. संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होऊ शकतं तर लोकपाल बैठकीचं का नाही असा सवाल प्रशांत भुषण यांनी केला. तसेच सरकार या चर्चेत विरोधी पक्षांना सामावून घेत नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.दरम्यान, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकार चांगलंच भेदरल्याचं दिसतंय. अण्णा हजारे दुसर्‍यांनी लिहून दिलेलं भाषण वाचतात अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2011 05:37 PM IST

संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण तर लोकपाल बैठकीचं का नाही !

13 जून

लोकपाल बिलाबाबत सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.प्रणव मुखर्जी यांनी रविवारी अण्णा आणि त्यांच्या टीमवर जोरदार टीका केली होती. आज अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भुषण यांनी सरकारवर हल्लाबोल केला. संसदेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होऊ शकतं तर लोकपाल बैठकीचं का नाही असा सवाल प्रशांत भुषण यांनी केला. तसेच सरकार या चर्चेत विरोधी पक्षांना सामावून घेत नाही, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

दरम्यान, अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकार चांगलंच भेदरल्याचं दिसतंय. अण्णा हजारे दुसर्‍यांनी लिहून दिलेलं भाषण वाचतात अशी बोचरी टीका काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 13, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close