S M L

चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकलमधून युवती पडून जखमी

14 जूनधावत्या लोकलमध्ये चोरानी केलेल्या हल्ल्यात 27 वर्षीय युवती लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे. जयश्री त्रिभूवन असं या युवतीचं नाव आहे. ऑफिसाच काम आवरून जयश्री नेहमी प्रमाणे लोकलने कल्याणकडे निघाली होती. मुंब्रा स्थानकाजवळ लोकल पोहचत असताना काही चोरट्यांनी जयश्रीची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी जयश्रीवर रॉड फेकून मारला. या हल्ल्यामुळे या जयश्रीचा तोल गेला आणि ती धावत्या लोकलमधून खाली पडली. त्यानंतर ट्रेनमधल्या प्रवाशांनी मंुब्रांला गाडी थांबवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या जयश्रीवर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या दोन दिवसातील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 11:12 AM IST

चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकलमधून युवती पडून जखमी

14 जून

धावत्या लोकलमध्ये चोरानी केलेल्या हल्ल्यात 27 वर्षीय युवती लोकलमधून खाली पडून गंभीर जखमी झाली आहे. जयश्री त्रिभूवन असं या युवतीचं नाव आहे. ऑफिसाच काम आवरून जयश्री नेहमी प्रमाणे लोकलने कल्याणकडे निघाली होती. मुंब्रा स्थानकाजवळ लोकल पोहचत असताना काही चोरट्यांनी जयश्रीची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्यांनी जयश्रीवर रॉड फेकून मारला.

या हल्ल्यामुळे या जयश्रीचा तोल गेला आणि ती धावत्या लोकलमधून खाली पडली. त्यानंतर ट्रेनमधल्या प्रवाशांनी मंुब्रांला गाडी थांबवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या जयश्रीवर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या दोन दिवसातील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close