S M L

डेंची कर्तव्य बजावताना हत्या !

14 जूनगेल्या शनिवारी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार जे.डे यांची हत्या झाली होती. त्यांची हत्या का करण्यात आली असावी याचा शोध पोलीस घेत होते. जे.डे यांनी केलेल्या बातमीमुळे संतापलेल्या व्यक्तींनीच त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर येतंय. मुंबई पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी ही माहिती दिली. जे. डे हत्या प्रकरणाला काल सोमवारी वेगळ वळण मिळाल. मुंबई उपनगराचे एसीपी अनिल महाबोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जे डे यांच्या हत्येचा संशयावरून बदली करण्यात आली. मात्र आज महाबोले यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना जे.डेंच्या हत्येप्रकरणी होत असलेले आरोप एसीपी अनिल महाबोले यांनी फेटाळले. आपल्याविरुद्ध हा कट असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.दरम्यान, डे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यायला नकार दिला नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पण आधी मुंबई पोलिसांना तपास करू द्या त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपवायचा का यावर विचार करू असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच एसीपींची बदली आपल्या सहीशिवाय होऊ शकत नाही आणि महाबळ यांच्या बदलीबाबत आपण सही केलेली नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी बदलीच्या या विषयावर उत्तर देणं टाळलंय. इतर बातम्या डे यांच्या हत्येशी संबंध नाही - महाबोले जे.डे हत्येप्रकरणी संशयिताचे स्केच जारी जे.डे हत्येचा तपास सीबीआयकडे द्या ; उपोषणाचा इशारा

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2011 12:40 PM IST

डेंची कर्तव्य बजावताना हत्या !

14 जून

गेल्या शनिवारी मुंबईत ज्येष्ठ पत्रकार जे.डे यांची हत्या झाली होती. त्यांची हत्या का करण्यात आली असावी याचा शोध पोलीस घेत होते. जे.डे यांनी केलेल्या बातमीमुळे संतापलेल्या व्यक्तींनीच त्यांची हत्या केल्याचे पोलीस तपासातून समोर येतंय. मुंबई पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी ही माहिती दिली.

जे. डे हत्या प्रकरणाला काल सोमवारी वेगळ वळण मिळाल. मुंबई उपनगराचे एसीपी अनिल महाबोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जे डे यांच्या हत्येचा संशयावरून बदली करण्यात आली. मात्र आज महाबोले यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना जे.डेंच्या हत्येप्रकरणी होत असलेले आरोप एसीपी अनिल महाबोले यांनी फेटाळले. आपल्याविरुद्ध हा कट असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, डे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यायला नकार दिला नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पण आधी मुंबई पोलिसांना तपास करू द्या त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपवायचा का यावर विचार करू असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच एसीपींची बदली आपल्या सहीशिवाय होऊ शकत नाही आणि महाबळ यांच्या बदलीबाबत आपण सही केलेली नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी बदलीच्या या विषयावर उत्तर देणं टाळलंय.

इतर बातम्या

डे यांच्या हत्येशी संबंध नाही - महाबोले जे.डे हत्येप्रकरणी संशयिताचे स्केच जारी जे.डे हत्येचा तपास सीबीआयकडे द्या ; उपोषणाचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2011 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close