S M L

'पृथ्वी'त 'कॉटन 56,पॉलिएस्टर 84' नाटक

11 नोव्हेंबर, मुंबई माधुरी निकुंभ पृथ्वी फेस्टिवलचा प्रत्येक दिवसच महत्त्वाचा असतो. फेस्टिवलचा सहावा दिवस गाजला तो कॉटन 56,पॉलिएस्टर 84 या नाटकानं. 'कॉटन 56,पॉलिएस्टर 84' या नाटकातून 1945पासून ते 90 पर्यंतचा गिरणगावचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे. नाटकाचे दिग्दर्शक सुनील शानबाग 'कॉटन 56,पॉलिएस्टर 84'बद्दल बोलताना म्हणाले, "गिरणगावची संस्कृती, गिरणगावचा इतिहास जो नव्या पिढीला माहीत नाही आहे, तो सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे." लावणी, पोवाडा, गोंधळ याचा वापर नाटकामध्ये भरपूर केला आहे. "कामगारांच्या जीवनातला लोकसंगीत, लोकनाट्य, लोकगीत हा त्यावेळेचा अविभाज्य भाग होता. तो कसा हे आम्ही आमच्या नाटकातून दाखवलं आहे," असं 'कॉटन 56,पॉलिएस्टर 84'चा अभिनेता नागेश ठाकूर म्हणाला. गिरणगावातल्या मिल कामगारांच्या गिरण्या बंद पडल्यानंतरचे त्यांचे दिवस या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतात. हे नाटक मुंबईकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न करतं, एवढं खरं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 12, 2008 12:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2008 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close