S M L

माऊलींचा अश्व आळंदीच्या वाटेवर

15 जूनमाऊलींच्या पालखी, शेजारील अश्व आणि पादुकांचा मान हा बेळगाव जिल्ह्यातील अंकली इथल्या शितोळे सरकारचा असतो. गेल्या 185 वर्षापासूनची परंपरा आजही जोपासली जाती. माऊलींचा अश्व आळंदीकडे रवाना झाला. हे अश्व मंगळवारी इस्लामपूरात पोहचले. पेशव्याना निजामा विरूध्दची लढाई जिंकून देण्यात अंकली येथील शितोळे सरकारनं मदत केली. त्यामुळे पेशव्यानी अंकली हा भाग शितोळे सरकारला इनाम म्हणून दिला. त्याचबरोबर माऊलींच्या पालखी शेजारील अश्व आणि पादुकांचा मानही त्यांना देण्यात आला. तेव्हापासून अवीरत शितोळे सरकारचे हे दोन अश्व माऊलींच्या सेवेसाठी जातात.रस्त्यात माउलींच्या अश्वाचे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वागत करतात. 13 जुनला ह्या अश्वाचं प्रस्थान अंकली इथून झालं असून आठ दिवसांनतर ते आळंदीला पोहचणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 03:14 PM IST

माऊलींचा अश्व आळंदीच्या वाटेवर

15 जून

माऊलींच्या पालखी, शेजारील अश्व आणि पादुकांचा मान हा बेळगाव जिल्ह्यातील अंकली इथल्या शितोळे सरकारचा असतो. गेल्या 185 वर्षापासूनची परंपरा आजही जोपासली जाती. माऊलींचा अश्व आळंदीकडे रवाना झाला. हे अश्व मंगळवारी इस्लामपूरात पोहचले. पेशव्याना निजामा विरूध्दची लढाई जिंकून देण्यात अंकली येथील शितोळे सरकारनं मदत केली.

त्यामुळे पेशव्यानी अंकली हा भाग शितोळे सरकारला इनाम म्हणून दिला. त्याचबरोबर माऊलींच्या पालखी शेजारील अश्व आणि पादुकांचा मानही त्यांना देण्यात आला. तेव्हापासून अवीरत शितोळे सरकारचे हे दोन अश्व माऊलींच्या सेवेसाठी जातात.रस्त्यात माउलींच्या अश्वाचे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वागत करतात. 13 जुनला ह्या अश्वाचं प्रस्थान अंकली इथून झालं असून आठ दिवसांनतर ते आळंदीला पोहचणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 03:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close