S M L

जळगावकर वाहन पार्किंगाच्या समस्याने हैराण

15 जूनपेट्रोलचे भाव जरी आकाशाला भिडत असले तरी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे.आणि याच वाहनांना पार्किंग करायला जागा नसल्याने वाहतूक व्यवस्था पूर्ण विस्कळीत झाल्याचे शहरात चित्र आहे. जळगाव शहरातील प्रमुख मार्गाच्या जवळ बाजारपेठ,अनेक सरकारी कार्यालय, रेल्वे स्थानक असल्याने कामासाठी हजारो वाहनधारक या रस्त्यावर येत असतात. पण कोणत्याही प्रकारची पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही वाहनं लावली जातात. त्यामुळे 60 फुटी असलेला हा रस्ता आता अक्षरश: 9 फूटी झाल्याचं चित्र आहे. याच भागात महापालिकेच्या 2 अत्यंत मोठ्या मोकळ्या जागा आहे. जुनी पालिका आणि साने गुरुजी हॉस्पिटल 6 वर्षांपूर्वी पालिकेनं पाडलं आणि याच जागांना आता फक्त हे तारेचं कुंपण घालून ठेवलंय. या जागा पार्किंगसाठी खुल्या केल्या तर पार्किंगचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात सुटू शकतो. पण पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांच्यातल्या समन्वयाच्या अभावाचा फटका मात्र सर्वसामान्य जळगांवकरांना रोजंच बसतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 03:20 PM IST

जळगावकर वाहन पार्किंगाच्या समस्याने हैराण

15 जून

पेट्रोलचे भाव जरी आकाशाला भिडत असले तरी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे.आणि याच वाहनांना पार्किंग करायला जागा नसल्याने वाहतूक व्यवस्था पूर्ण विस्कळीत झाल्याचे शहरात चित्र आहे. जळगाव शहरातील प्रमुख मार्गाच्या जवळ बाजारपेठ,अनेक सरकारी कार्यालय, रेल्वे स्थानक असल्याने कामासाठी हजारो वाहनधारक या रस्त्यावर येत असतात.

पण कोणत्याही प्रकारची पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही वाहनं लावली जातात. त्यामुळे 60 फुटी असलेला हा रस्ता आता अक्षरश: 9 फूटी झाल्याचं चित्र आहे. याच भागात महापालिकेच्या 2 अत्यंत मोठ्या मोकळ्या जागा आहे.

जुनी पालिका आणि साने गुरुजी हॉस्पिटल 6 वर्षांपूर्वी पालिकेनं पाडलं आणि याच जागांना आता फक्त हे तारेचं कुंपण घालून ठेवलंय. या जागा पार्किंगसाठी खुल्या केल्या तर पार्किंगचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात सुटू शकतो. पण पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यांच्यातल्या समन्वयाच्या अभावाचा फटका मात्र सर्वसामान्य जळगांवकरांना रोजंच बसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close