S M L

स्वामी निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी !

15 जूनतब्बल 69 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या स्वामी निगमानंद यांचा सोमवारी मृत्यू झाला. स्वामी निगमानंद यांचा विषबाधेमुळे झाला असावा असं त्यांच्या ब्लड पॅथॉलॉजी रिपोर्टमधून दिसून येतंय. गंगा नदीपात्रातल्या मायनिंग प्रकल्पावर बंदी घालायला उत्तराखंड सरकारने नकार दिल्यामुळे निगमानंद उपोषणाला बसले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोमात गेले होते. पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार त्यांच्या रक्तात टॉक्सिनचं खूप जास्त प्रमाण आढळून आलंय. हे विषारी द्रव्य कीटकनाशकांचं असल्याचंही आढळलं. दरम्यान निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी स्वामी अग्निवेश यांनी केली. तसेच त्यांच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची मागणीही त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2011 03:40 PM IST

स्वामी निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी !

15 जून

तब्बल 69 दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या स्वामी निगमानंद यांचा सोमवारी मृत्यू झाला. स्वामी निगमानंद यांचा विषबाधेमुळे झाला असावा असं त्यांच्या ब्लड पॅथॉलॉजी रिपोर्टमधून दिसून येतंय. गंगा नदीपात्रातल्या मायनिंग प्रकल्पावर बंदी घालायला उत्तराखंड सरकारने नकार दिल्यामुळे निगमानंद उपोषणाला बसले होते.

प्रकृती बिघडल्याने त्यांना डेहराडूनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोमात गेले होते. पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार त्यांच्या रक्तात टॉक्सिनचं खूप जास्त प्रमाण आढळून आलंय. हे विषारी द्रव्य कीटकनाशकांचं असल्याचंही आढळलं. दरम्यान निगमानंद यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी स्वामी अग्निवेश यांनी केली. तसेच त्यांच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची मागणीही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2011 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close