S M L

नाराज मुंडेंना हवी प्रभारीपदाची जबाबदारी !

16 जूनअस्वस्थ गोपीनाथ मुंडे अखेर दिल्लीला भाजपश्रेष्ठींशी चर्चा करायला जाणार आहेत. 18 जूनला होणार्‍या भाजपश्रेष्ठींच्या बैठकीत मुंडे आपलं गार्‍हाणं मांडतील. मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी पदाची मागणी केल्याचे समोर येत आहे. दरम्यान मुंडेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलणी सुरूच आहे.दिल्लीचा निरोप घेऊन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अस्वस्थ गोपीनाथ मुंडेंची मनधरणी करायला मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुंडेंची भेट घेतली. दिल्लीत झालेली चर्चा त्यांच्या कानावर घातली. आणि ते मुंडेंचं मन वळवण्यात यशस्वी झाले.पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत स्थान नसल्याने गोपीनाथ मुंडेंना राज्याच्या राजकारणात सक्रीय होत येत नाही ही खरी मुंडेंची नाराजी आहे. प्रमोद महाजन यांच्याप्रमाणेच मुंडेंनाही महाराष्ट्र भाजपचं प्रभारी पद हवं आहे. तशी मागणीही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी येत्या रविवारी बैठक बोलावली असतानाही गोपीनाथ मुंडेंनी पुन्हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची बुधवारी भेट घेतली. तसेच गुरुवारी सकाळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी मुंडेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे सेनाभवनात शिवसेना कार्याध्यक्षांना भेटले. या सर्व घटनाक्रमांमुळे मुंडे यांच्याविषयीचा सस्पेन्स कायम आहे असेच म्हणावे लागेल. मुंडेंसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतःचं बळ वापरतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 05:24 PM IST

नाराज मुंडेंना हवी प्रभारीपदाची जबाबदारी !

16 जून

अस्वस्थ गोपीनाथ मुंडे अखेर दिल्लीला भाजपश्रेष्ठींशी चर्चा करायला जाणार आहेत. 18 जूनला होणार्‍या भाजपश्रेष्ठींच्या बैठकीत मुंडे आपलं गार्‍हाणं मांडतील. मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी पदाची मागणी केल्याचे समोर येत आहे. दरम्यान मुंडेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोलणी सुरूच आहे.

दिल्लीचा निरोप घेऊन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अस्वस्थ गोपीनाथ मुंडेंची मनधरणी करायला मुंबईत दाखल झाले. त्यांनी मुंडेंची भेट घेतली. दिल्लीत झालेली चर्चा त्यांच्या कानावर घातली. आणि ते मुंडेंचं मन वळवण्यात यशस्वी झाले.

पक्षाच्या निर्णयप्रक्रियेत स्थान नसल्याने गोपीनाथ मुंडेंना राज्याच्या राजकारणात सक्रीय होत येत नाही ही खरी मुंडेंची नाराजी आहे. प्रमोद महाजन यांच्याप्रमाणेच मुंडेंनाही महाराष्ट्र भाजपचं प्रभारी पद हवं आहे. तशी मागणीही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींनी येत्या रविवारी बैठक बोलावली असतानाही गोपीनाथ मुंडेंनी पुन्हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंची बुधवारी भेट घेतली. तसेच गुरुवारी सकाळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी मुंडेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

त्यानंतर एकनाथ शिंदे सेनाभवनात शिवसेना कार्याध्यक्षांना भेटले. या सर्व घटनाक्रमांमुळे मुंडे यांच्याविषयीचा सस्पेन्स कायम आहे असेच म्हणावे लागेल. मुंडेंसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतःचं बळ वापरतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close