S M L

जुहू किनार्‍यावरील जहाजाला काढण्याचे ऑपरेशन उद्यावर

16 जूनमुंबईच्या जुहू किनार्‍यावर अडकलेल्या एमव्ही व्हिस्डम जहाजाला काढण्यासाठी नेव्हीचं ऑपरेशन सुरू होणार आहे. पण या जहाजाला टो करण्यासाठी लागणारं जहाज उद्या येणार असल्यानं आता हे ऑपरेशन उद्या सुरू होणार असल्याचं नेव्हीनं स्पष्ट केलं. रविवारी हे इथं जहाज अडकलं होतं. हेलिकॉप्टरमधून स्टील केबल्सच्या साह्याने हे जहाज खेचण्याची तयारी करण्यात येतं आहे. एम व्ही विस्डम हे मालवाहु जहाज कोलंबोहुन गुजरातच्या अलंग बंदरात जात होतं. कोणीही कर्मचारी नसलेल्या या जहाजाला दुसरं एक जहाज टो करुन घेऊन जात होतं. मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात आल्यानंतर विस्डम जहाज अचानक भरकटलं. आणि हे जहाज वांद्रे वरळी सी लिंक ला धडकणार अशी भीती निर्माण झाली होती. पण नेव्ही आणि कोस्ट गार्ड यांच्या रेस्क्यु टीमने खबरदारी घेत या जहाजाला सी-लिंक पासून दूर नेलं.यानंतर हे जहाज जुहू किनार्‍यावर येऊन वाळूत फसलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 10:40 AM IST

जुहू किनार्‍यावरील जहाजाला काढण्याचे ऑपरेशन उद्यावर

16 जून

मुंबईच्या जुहू किनार्‍यावर अडकलेल्या एमव्ही व्हिस्डम जहाजाला काढण्यासाठी नेव्हीचं ऑपरेशन सुरू होणार आहे. पण या जहाजाला टो करण्यासाठी लागणारं जहाज उद्या येणार असल्यानं आता हे ऑपरेशन उद्या सुरू होणार असल्याचं नेव्हीनं स्पष्ट केलं. रविवारी हे इथं जहाज अडकलं होतं.

हेलिकॉप्टरमधून स्टील केबल्सच्या साह्याने हे जहाज खेचण्याची तयारी करण्यात येतं आहे. एम व्ही विस्डम हे मालवाहु जहाज कोलंबोहुन गुजरातच्या अलंग बंदरात जात होतं. कोणीही कर्मचारी नसलेल्या या जहाजाला दुसरं एक जहाज टो करुन घेऊन जात होतं.

मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात आल्यानंतर विस्डम जहाज अचानक भरकटलं. आणि हे जहाज वांद्रे वरळी सी लिंक ला धडकणार अशी भीती निर्माण झाली होती. पण नेव्ही आणि कोस्ट गार्ड यांच्या रेस्क्यु टीमने खबरदारी घेत या जहाजाला सी-लिंक पासून दूर नेलं.यानंतर हे जहाज जुहू किनार्‍यावर येऊन वाळूत फसलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close