S M L

ठाण्यात टिएमटी बससेवेत 1 रुपयाने वाढ

16 जूनठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेनं बस भाड्यात आज 1 रुपया दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आधीच महागाईने जेरीस आलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी नवा भार सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे टीएमटीनेे हा निर्णय घेतल्याचं समजतंय. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एसी बसच्या भाड्यात मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसीची हवा जुन्याच भाड्यात अनुभवता येणार आहे. नव्या दरवाढीनुसार आता किमान दर 4 वरून 5 रूपये होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 03:15 PM IST

ठाण्यात टिएमटी बससेवेत 1 रुपयाने वाढ

16 जून

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेनं बस भाड्यात आज 1 रुपया दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आधीच महागाईने जेरीस आलेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी नवा भार सोसावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे टीएमटीनेे हा निर्णय घेतल्याचं समजतंय. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे एसी बसच्या भाड्यात मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसीची हवा जुन्याच भाड्यात अनुभवता येणार आहे. नव्या दरवाढीनुसार आता किमान दर 4 वरून 5 रूपये होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close