S M L

हुक्का पार्लरवर धाड 2 मुलींसह 61 तरुण ताब्यात

16 जूनऔरंगाबादमध्ये पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाडी टाकून 2 मुलींसह 61 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. विनापरवाना चालणार्‍या या हुक्का पार्लरमध्ये अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे जप्त केलेले हुक्के आणि वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची उत्पादनंही जप्त करून ती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. विनापरवाना चालवणार्‍या जाणार्‍या हुक्का पार्लरमध्ये अनेक गैरप्रकार पोलिसांना आढळले. विशेषत: या पार्लरमध्ये जाणार्‍या मुलींना ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी शहरातील निराला बाजार, सिडको, उस्मानपुरा, सेव्हनहिल या भागात धाडी टाकल्या. हे हुक्का सेंटर चालविणार्‍या अक्षय झुनझुनवाला, सुशील दांडगे, मनोज सालढाणा, वृषभ जैन, अमोल पवार यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये फ्लेव्हर्सच्या नावाखाली अंमली पदार्थांचा वापर केला जात आहे का? याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 16, 2011 04:35 PM IST

हुक्का पार्लरवर धाड 2 मुलींसह 61 तरुण ताब्यात

16 जून

औरंगाबादमध्ये पोलिसांनी हुक्का पार्लरवर धाडी टाकून 2 मुलींसह 61 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. विनापरवाना चालणार्‍या या हुक्का पार्लरमध्ये अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे जप्त केलेले हुक्के आणि वेगवेगळ्या फ्लेव्हर्सची उत्पादनंही जप्त करून ती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.

विनापरवाना चालवणार्‍या जाणार्‍या हुक्का पार्लरमध्ये अनेक गैरप्रकार पोलिसांना आढळले. विशेषत: या पार्लरमध्ये जाणार्‍या मुलींना ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यामुळे पोलिसांनी शहरातील निराला बाजार, सिडको, उस्मानपुरा, सेव्हनहिल या भागात धाडी टाकल्या. हे हुक्का सेंटर चालविणार्‍या अक्षय झुनझुनवाला, सुशील दांडगे, मनोज सालढाणा, वृषभ जैन, अमोल पवार यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये फ्लेव्हर्सच्या नावाखाली अंमली पदार्थांचा वापर केला जात आहे का? याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2011 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close