S M L

ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचं निधन

17 जूनआपल्या प्रयोगशील लेखनाने मराठी साहित्यात आपली वेगळी छाप निर्माण करणार्‍या ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचं आज सांगलीमध्ये निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्भिड कथालेखिका म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य, चित्रकला आणि यांच्या सांस्कृतीक क्षेत्रातील नव्या पिढीशी त्यांचा चांगला संवाद होता. 'हॅट घालणारी बाई', आणि 'काळा सूर्य' या लघुकादंबर्‍या, 'रंग' 1 आणि 'रंग' 2 हे त्यांचे कथासंग्रह चांगलेच गाजले होते. त्यातील 'तिळा बंद' कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरीकेतील अभ्याक्रमात घेतली होती. स्त्री पुरूष नातेसंबंधांवर त्यांचं विशेष लिखाण होतं. सौंदर्यशास्त्रावर अधिकारवाणीने त्यांनी लिखाण होतं. त्यांच्या कथांचे जर्मन आणि फ्रेंच भाषेत अनुवाद ही होता तसेच देवचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 12:33 PM IST

ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचं निधन

17 जून

आपल्या प्रयोगशील लेखनाने मराठी साहित्यात आपली वेगळी छाप निर्माण करणार्‍या ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांचं आज सांगलीमध्ये निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. निर्भिड कथालेखिका म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य, चित्रकला आणि यांच्या सांस्कृतीक क्षेत्रातील नव्या पिढीशी त्यांचा चांगला संवाद होता.

'हॅट घालणारी बाई', आणि 'काळा सूर्य' या लघुकादंबर्‍या, 'रंग' 1 आणि 'रंग' 2 हे त्यांचे कथासंग्रह चांगलेच गाजले होते. त्यातील 'तिळा बंद' कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरीकेतील अभ्याक्रमात घेतली होती. स्त्री पुरूष नातेसंबंधांवर त्यांचं विशेष लिखाण होतं. सौंदर्यशास्त्रावर अधिकारवाणीने त्यांनी लिखाण होतं. त्यांच्या कथांचे जर्मन आणि फ्रेंच भाषेत अनुवाद ही होता तसेच देवचंद कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close