S M L

रामलीलावर कारवाईचं पोलिसांनी केलं समर्थन

17 जूनदिल्लीतील रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांच्या आंदोलनाविरोधात मध्यरात्री केलेल्या कारवाईचं दिल्ली पोलिसांनी समर्थन केलं आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात बाबा रामदेव यांना फक्त योगशिबिरासाठी परवानगी दिली होती. इतर कोणत्याही कारणासाठी नव्हती असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. 4 आणि 5 जून रोजी रामलीला मैदानावर केवळ 10 हजार लोकांच्या जमावासाठी परवानगी होती. पण प्रत्यक्षात 20 हजार पेक्षा जास्त लोक त्याठिकाणी जमले होते असा दावा पोलिसांनी केला. कारवाईच्या वेळी बाबा रामदेव यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळेच नाईलाजाने पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत केंद्रीय गृहसचिव, दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली होती. त्यावर दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 05:37 PM IST

रामलीलावर कारवाईचं पोलिसांनी केलं समर्थन

17 जून

दिल्लीतील रामलीला मैदानावर बाबा रामदेव यांच्या आंदोलनाविरोधात मध्यरात्री केलेल्या कारवाईचं दिल्ली पोलिसांनी समर्थन केलं आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात बाबा रामदेव यांना फक्त योगशिबिरासाठी परवानगी दिली होती. इतर कोणत्याही कारणासाठी नव्हती असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

4 आणि 5 जून रोजी रामलीला मैदानावर केवळ 10 हजार लोकांच्या जमावासाठी परवानगी होती. पण प्रत्यक्षात 20 हजार पेक्षा जास्त लोक त्याठिकाणी जमले होते असा दावा पोलिसांनी केला. कारवाईच्या वेळी बाबा रामदेव यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

त्यामुळेच नाईलाजाने पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला असंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईची सुप्रीम कोर्टाने स्वतःहून दखल घेत केंद्रीय गृहसचिव, दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली होती. त्यावर दिल्ली पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close