S M L

नाना पाटेकर पुन्हा करणार रंगभूमीवर एन्ट्री

17 जूनअनेक वर्षांनंतर नाना पाटेकर आता आपल्याला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत. आणि तेही त्यांच्या झिप्रू या आगामी नाटकातून. मंगेश कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. अभिनेता मनोज जोशी यांनी या नाटकाची निर्मिती केली. जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. एक आयपीएस अधिकारी आणि पीएचडी करणारी एक मुलगी या दोघांभोवती हे नाटक फिरतं. नाटकात नाना पाटेकर या पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर मुलीची भूमिका कोण करेल याबाबत जरा फेरविचार चालू आहे. पण आता अनेक दिवसानंतर नाना पुन्हा रंगभूमीवर काम करताना दिसणार ही त्यांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 03:52 PM IST

नाना पाटेकर पुन्हा करणार रंगभूमीवर एन्ट्री

17 जून

अनेक वर्षांनंतर नाना पाटेकर आता आपल्याला पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत. आणि तेही त्यांच्या झिप्रू या आगामी नाटकातून. मंगेश कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. अभिनेता मनोज जोशी यांनी या नाटकाची निर्मिती केली.

जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. एक आयपीएस अधिकारी आणि पीएचडी करणारी एक मुलगी या दोघांभोवती हे नाटक फिरतं.

नाटकात नाना पाटेकर या पोलीस अधिकार्‍याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. तर मुलीची भूमिका कोण करेल याबाबत जरा फेरविचार चालू आहे. पण आता अनेक दिवसानंतर नाना पुन्हा रंगभूमीवर काम करताना दिसणार ही त्यांच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close