S M L

बालमोहन विद्यामंदिरात मराठीचे वर्ग उद्यापासून सुरु

17 जूनदादरच्या बालमोहन विद्यामंदिराच्या मराठी माध्यमांचे 1 ली ते 4 थी चे बंद असलेले वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. मराठी माध्यमाचे हे वर्ग 15 जूनला शाळा सुरू झाल्यापासूनच बंद होते. शासकीय अनुदान नसल्याने वर्ग बंद करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितलं. तर 6 व्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा या मागणीसाठी मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी शिकवणं बंद केलं होतं. शाळा सुरू झाल्यापासून मराठी माध्यमातील विद्यार्थी शाळेत येऊन जातं आहे. पण हे वर्ग मात्र बंद होते. आज पालक प्रतिनिधी आणि मनसे शिष्टमंडळाने व्यवस्थापनाची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढायला मध्यस्थी केली. आता उद्यापासून मराठी माध्यमाची बालमोहन शाळा पुन्हा सुरू होणार आहे.दरम्यान, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याकरता शाळेला फि वाढ करणे भाग आहे असं संस्थेचे अध्यक्ष गिरीश रेगे यांनी सांगितले. पालक आणि बालमोहनच्या शिक्षकांची व्यवस्थापनासोबत रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत फि वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 17, 2011 03:59 PM IST

बालमोहन विद्यामंदिरात मराठीचे वर्ग उद्यापासून सुरु

17 जून

दादरच्या बालमोहन विद्यामंदिराच्या मराठी माध्यमांचे 1 ली ते 4 थी चे बंद असलेले वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. मराठी माध्यमाचे हे वर्ग 15 जूनला शाळा सुरू झाल्यापासूनच बंद होते. शासकीय अनुदान नसल्याने वर्ग बंद करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितलं.

तर 6 व्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा या मागणीसाठी मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी शिकवणं बंद केलं होतं. शाळा सुरू झाल्यापासून मराठी माध्यमातील विद्यार्थी शाळेत येऊन जातं आहे. पण हे वर्ग मात्र बंद होते. आज पालक प्रतिनिधी आणि मनसे शिष्टमंडळाने व्यवस्थापनाची भेट घेऊन या विषयावर तोडगा काढायला मध्यस्थी केली. आता उद्यापासून मराठी माध्यमाची बालमोहन शाळा पुन्हा सुरू होणार आहे.

दरम्यान, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याकरता शाळेला फि वाढ करणे भाग आहे असं संस्थेचे अध्यक्ष गिरीश रेगे यांनी सांगितले. पालक आणि बालमोहनच्या शिक्षकांची व्यवस्थापनासोबत रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत फि वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2011 03:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close