S M L

कडोंम पालिकेत लाचखोर अधिकार्‍याला सेवेत घेण्याचा प्रस्ताव मागे

19 जूनकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्ताधार्‍यांना अखेर जाग आल्याचं दिसतंय. लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला सेवेत परत घेण्याचा प्रस्ताव शिवसेना आता मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार नाही, असा पवित्रा आता सेनेनं घेतला आहे. मोठा गाजावाजा करत सुनील जोशीला सेवेत घेण्याचा प्रस्ताव काल कल्याण डोंबिवली महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. पण या निर्णयावर सगळीकडूनच टीकेची झोड उठली. भ्रष्टाचारी अधिकार्‍याला सरळ सरळ कव्हर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहून राजकीय पक्षांसह सामान्यही संतापले. त्याचे पडसाद थेट मातोश्रीपर्यंत उमटले. आणि अखेर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय थेट मातोश्रीहून घेण्यात आला. दरम्यान सुनील जोशीला सेवेत घेण्याच्या प्रस्तावामागे महापौरांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 10:26 AM IST

कडोंम पालिकेत लाचखोर अधिकार्‍याला सेवेत घेण्याचा प्रस्ताव मागे

19 जून

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्ताधार्‍यांना अखेर जाग आल्याचं दिसतंय. लाचखोर कार्यकारी अभियंता सुनील जोशी याला सेवेत परत घेण्याचा प्रस्ताव शिवसेना आता मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणार नाही, असा पवित्रा आता सेनेनं घेतला आहे.

मोठा गाजावाजा करत सुनील जोशीला सेवेत घेण्याचा प्रस्ताव काल कल्याण डोंबिवली महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. पण या निर्णयावर सगळीकडूनच टीकेची झोड उठली.

भ्रष्टाचारी अधिकार्‍याला सरळ सरळ कव्हर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहून राजकीय पक्षांसह सामान्यही संतापले. त्याचे पडसाद थेट मातोश्रीपर्यंत उमटले. आणि अखेर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय थेट मातोश्रीहून घेण्यात आला.

दरम्यान सुनील जोशीला सेवेत घेण्याच्या प्रस्तावामागे महापौरांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close