S M L

अंबरनाथमध्ये नाले सफाईला मिळेना प्रशासनाचे सहकार्य !

गणेश गायकवाड, अंबरनाथ19 जूनअंबरनाथमध्येही नालेसफाईची मोठी समस्या आहे. स्टेशनला लागून असलेल्या स्वामीनगर परिसरातल्या शेकडो घरात दरवर्षी पावसाचं पाणी शिरतं. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील असहकार्यामुळे ही समस्या अजून सुटू शकलेली नाही. अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाजूचानाला. पावसाळ्यात दरवर्षी नाल्याची काठापर्यंतची परिस्थिती अशीच असते. अनेक वर्ष झाले नाल्याची सफाई होतच नाही. नाल्याच्या शेजारी पाचशेहून जास्त कुटुंब राहतात. नालेसफाई न झाल्यामुळे दरवर्षी या घरांमध्ये पाणी शिरतं. मात्र नालेसफाईची जबाबदारी असलेली महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातल्या असहकार्यामुळेच हा प्रश्न सुटत नाही. पावसाळ्याला जेमतेम सुरुवात झाली आहे. तातडीने या नाल्याची सफाई करणं शक्य आहे. पण, त्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 11:47 AM IST

अंबरनाथमध्ये नाले सफाईला मिळेना प्रशासनाचे सहकार्य !

गणेश गायकवाड, अंबरनाथ

19 जून

अंबरनाथमध्येही नालेसफाईची मोठी समस्या आहे. स्टेशनला लागून असलेल्या स्वामीनगर परिसरातल्या शेकडो घरात दरवर्षी पावसाचं पाणी शिरतं. महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील असहकार्यामुळे ही समस्या अजून सुटू शकलेली नाही.

अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या बाजूचानाला. पावसाळ्यात दरवर्षी नाल्याची काठापर्यंतची परिस्थिती अशीच असते. अनेक वर्ष झाले नाल्याची सफाई होतच नाही. नाल्याच्या शेजारी पाचशेहून जास्त कुटुंब राहतात.

नालेसफाई न झाल्यामुळे दरवर्षी या घरांमध्ये पाणी शिरतं. मात्र नालेसफाईची जबाबदारी असलेली महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातल्या असहकार्यामुळेच हा प्रश्न सुटत नाही. पावसाळ्याला जेमतेम सुरुवात झाली आहे. तातडीने या नाल्याची सफाई करणं शक्य आहे. पण, त्यासाठी गरज आहे इच्छाशक्तीची...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close