S M L

बीडमध्ये पुन्हा एक अर्भक सापडले

19 जूनबीड जिल्ह्यातील परळी येथे मागील आठवड्यात 9 मुलींची अर्भक नाल्यात सापडली होती. आठवडा उलटत नाही तर आणखी एका मुलीचं अर्भक पडक्या विहिरीत सापडलं आहे. हे अर्भक 4 ते 5 महिन्याचे आहे. पोलिसांनी याप्रकरणी डॉ.सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्यासह अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात मुलींची 9 अर्भक फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना आयबीएन लोकमतने उघडकीस आणली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने 11 सोनोग्राफी सेंटर सील केले तर 6 गर्भपात केंद्रांची मान्यता रद्द केली. आता पुन्हा हे अर्भक सापडल्याने नागरिक संतप्त झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 12:34 PM IST

बीडमध्ये पुन्हा एक अर्भक सापडले

19 जून

बीड जिल्ह्यातील परळी येथे मागील आठवड्यात 9 मुलींची अर्भक नाल्यात सापडली होती. आठवडा उलटत नाही तर आणखी एका मुलीचं अर्भक पडक्या विहिरीत सापडलं आहे. हे अर्भक 4 ते 5 महिन्याचे आहे.

पोलिसांनी याप्रकरणी डॉ.सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्यासह अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पण अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गेल्या आठवड्यात मुलींची 9 अर्भक फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना आयबीएन लोकमतने उघडकीस आणली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने 11 सोनोग्राफी सेंटर सील केले तर 6 गर्भपात केंद्रांची मान्यता रद्द केली. आता पुन्हा हे अर्भक सापडल्याने नागरिक संतप्त झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close