S M L

मुंडेंच्या काही मागण्या मान्य

19 जूनअखेर नाराज गोपीनाथ मुंडे यांची पक्षश्रेष्ठींना दखल घ्यावीच लागली. गेल्या कितेक दिवसापासून नाराज असलेल्या मुंडे यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहे. पक्षश्रेष्ठीसमोर आपली व्यथा मांडली आहे आमची चर्चा सकारात्मक झाली आहे पण चर्चा सुरू आहे असं गोपीनाथ मुंडे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. तर महाराष्ट्र भाजपचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये शिष्टाई केली. बैठक संपल्यानंतर मुंडे आणि नायडू सोबत आले. मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नायडू म्हणाले की, मुंडे यांनी आपली व्यथा मांडली आहे त्यांनी मांडलेल्या मुद्यावर पक्षश्रेष्ठी विचार करत आहे. मात्र चर्चा सुरू आहे. असं स्पष्टीकरण नायडू यांनी दिलं.दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी मुंडेंच्या नाराजीप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अंतिम बैठक पार पडली. या बैठकीत मुंडेंना प्रभारीपद देण्यात आलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईचे भाजपाध्यक्ष राज पुरोहितांना जीवदान मिळाले आहे. तर पुणे भाजपाध्यक्षपदाविषयी चर्चा सुरू आहे. हे पद फुंडकरांना काही काळ मिळणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. ही बैठक आज संध्याकाळी सात वाजता होणार होती. पण रात्री 10 च्या सुमारास बैठक सुरू झाली तब्बल दीड तास ही बैठक चालली.नाराज गोपीनाथ मुंडे काल दिल्लीत दाखल झाले. काल प्रथम दिल्लीत व्यंकय्या नायडू यांच्या घरी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते. या बैठकीत मुंडेंचं गार्‍हाणं ऐकून घेतलं गेलं आणि बैठक सकारात्मक झाल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितलं. अध्यक्ष नितीन गडकरी डेहराडून येथे अडकल्याने ते दिल्लीला काल येऊ शकले नव्हते. पण आजची अंतिम बैठक पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली. आता उद्या नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 04:04 PM IST

मुंडेंच्या काही मागण्या मान्य

19 जून

अखेर नाराज गोपीनाथ मुंडे यांची पक्षश्रेष्ठींना दखल घ्यावीच लागली. गेल्या कितेक दिवसापासून नाराज असलेल्या मुंडे यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहे. पक्षश्रेष्ठीसमोर आपली व्यथा मांडली आहे आमची चर्चा सकारात्मक झाली आहे पण चर्चा सुरू आहे असं गोपीनाथ मुंडे यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं.

तर महाराष्ट्र भाजपचे प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये शिष्टाई केली. बैठक संपल्यानंतर मुंडे आणि नायडू सोबत आले. मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतर नायडू म्हणाले की, मुंडे यांनी आपली व्यथा मांडली आहे त्यांनी मांडलेल्या मुद्यावर पक्षश्रेष्ठी विचार करत आहे. मात्र चर्चा सुरू आहे. असं स्पष्टीकरण नायडू यांनी दिलं.

दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी मुंडेंच्या नाराजीप्रकरणी तोडगा काढण्यासाठी अंतिम बैठक पार पडली. या बैठकीत मुंडेंना प्रभारीपद देण्यात आलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईचे भाजपाध्यक्ष राज पुरोहितांना जीवदान मिळाले आहे.

तर पुणे भाजपाध्यक्षपदाविषयी चर्चा सुरू आहे. हे पद फुंडकरांना काही काळ मिळणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. ही बैठक आज संध्याकाळी सात वाजता होणार होती. पण रात्री 10 च्या सुमारास बैठक सुरू झाली तब्बल दीड तास ही बैठक चालली.

नाराज गोपीनाथ मुंडे काल दिल्लीत दाखल झाले. काल प्रथम दिल्लीत व्यंकय्या नायडू यांच्या घरी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत गोपीनाथ मुंडे, व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, सुधीर मुनगंटीवार, पांडुरंग फुंडकर आणि एकनाथ खडसे उपस्थित होते.

या बैठकीत मुंडेंचं गार्‍हाणं ऐकून घेतलं गेलं आणि बैठक सकारात्मक झाल्याचे वेंकय्या नायडू यांनी सांगितलं. अध्यक्ष नितीन गडकरी डेहराडून येथे अडकल्याने ते दिल्लीला काल येऊ शकले नव्हते.

पण आजची अंतिम बैठक पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली. आता उद्या नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close