S M L

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात - दिग्विजय सिंग

19 जूनकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी राहुलचं कौतुक केलं. गेल्या 7-8 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असल्यामुळे ते आता पंतप्रधान होऊ शकतात असं मत सिंग यांनी व्यक्त केलं. दरम्यान, दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा वाढदिवस मिठाई वाटून जल्लोषात साजरा केला. लखनऊमध्ये आजचा दिवस 'किसान अधिकार दिवस' म्हणून जाहीर करण्यात आला होता. राहुल गांधी मात्र इथे उपस्थित नव्हते. तर भट्टा-परसौल गावांत आज एक खास पंचायत बैठक आयोजित करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2011 04:49 PM IST

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात - दिग्विजय सिंग

19 जून

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्त काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी राहुलचं कौतुक केलं. गेल्या 7-8 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असल्यामुळे ते आता पंतप्रधान होऊ शकतात असं मत सिंग यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा वाढदिवस मिठाई वाटून जल्लोषात साजरा केला. लखनऊमध्ये आजचा दिवस 'किसान अधिकार दिवस' म्हणून जाहीर करण्यात आला होता. राहुल गांधी मात्र इथे उपस्थित नव्हते. तर भट्टा-परसौल गावांत आज एक खास पंचायत बैठक आयोजित करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2011 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close