S M L

'द वॉल' द्रविडच्या टेस्ट करिअरला 15 वर्षं पूर्ण

स्वाती घोसाळकर, मंुबई20 जूनभारतीय बॅटिंगचा आधारस्तंभ असणार्‍या राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज 15 वर्ष पूर्ण होत आहे. राहुल द्रविडच्या गौरवशाली क्रिकेटला दिलेला हा उजाळा.राहुल द्रविडने आपल्या टेस्ट करिअरला सुरुवात केली 1996 ला. इंग्लंडविरुद्ध. काही काळातच तो भारतीय टीममधील प्रमुख बॅट्समन बनला. क्रिझवर टिकून खेळण्याची त्याची स्टाईल. यामुळेच क्रिकेट जगतात तो 'द वॉल' या नावाने ओळखला जाऊ लागला. द्रविडने आतापर्यंत एकशे पन्नास टेस्ट मॅचमध्ये 12063 रन्स केले आहे. त्यात 31 सेंच्युरी आणि 59 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 150 टेस्ट पैकी 53 टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे.दोन हजार चारमध्ये पाकिस्तान दौर्‍यात द्रविडने केलेली दोनशे सत्तर रन्सची इनिंग ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टेन थाऊझंड क्लबमध्ये प्रवेश करणारा तो जगातला सहावा बॅटस्‌मन ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 20, 2011 12:59 PM IST

'द वॉल' द्रविडच्या टेस्ट करिअरला 15 वर्षं पूर्ण

स्वाती घोसाळकर, मंुबई

20 जून

भारतीय बॅटिंगचा आधारस्तंभ असणार्‍या राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज 15 वर्ष पूर्ण होत आहे. राहुल द्रविडच्या गौरवशाली क्रिकेटला दिलेला हा उजाळा.

राहुल द्रविडने आपल्या टेस्ट करिअरला सुरुवात केली 1996 ला. इंग्लंडविरुद्ध. काही काळातच तो भारतीय टीममधील प्रमुख बॅट्समन बनला. क्रिझवर टिकून खेळण्याची त्याची स्टाईल. यामुळेच क्रिकेट जगतात तो 'द वॉल' या नावाने ओळखला जाऊ लागला.

द्रविडने आतापर्यंत एकशे पन्नास टेस्ट मॅचमध्ये 12063 रन्स केले आहे. त्यात 31 सेंच्युरी आणि 59 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 150 टेस्ट पैकी 53 टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे.

दोन हजार चारमध्ये पाकिस्तान दौर्‍यात द्रविडने केलेली दोनशे सत्तर रन्सची इनिंग ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. टेन थाऊझंड क्लबमध्ये प्रवेश करणारा तो जगातला सहावा बॅटस्‌मन ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 20, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close