S M L

'लोकपाल' मसुदा समितीची आज शेवटची बैठक

21 जूनलोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समितीची आज शेवटची बैठक आहे. या बैठकीतून तरी काही तोडगा निघतो का हे काही वेळातच समजेल. काल झालेल्या आठव्या बैठकीत केंद्र सरकार आणि जनप्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांनी दावा केला की 80 टक्के मुद्द्यांवर सहमती झाली. पण आयबीएन लोकमतशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हा दावा खोडून काढला. मतभेद अजूनही कायम असल्यामुळे दोन वेगवेगळे मसुदे कॅबिनेटकडे पाठवले जातील किंवा एकाच मसुद्यात वादग्रस्त मुद्द्यांवर दोन पर्याय देऊन हा मसुदा कॅबिनेटकडे पाठवला जाईल. दरम्यान, शेवटच्या बैठकीआधी काही वेळापूर्वी पंतप्रधानांनी लोकपाल समितीतल्या मंत्र्यांची बैठक घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2011 09:59 AM IST

'लोकपाल' मसुदा समितीची आज शेवटची बैठक

21 जून

लोकपाल बिलाचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त समितीची आज शेवटची बैठक आहे. या बैठकीतून तरी काही तोडगा निघतो का हे काही वेळातच समजेल. काल झालेल्या आठव्या बैठकीत केंद्र सरकार आणि जनप्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारच्या वतीने कपिल सिब्बल यांनी दावा केला की 80 टक्के मुद्द्यांवर सहमती झाली.

पण आयबीएन लोकमतशी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी हा दावा खोडून काढला. मतभेद अजूनही कायम असल्यामुळे दोन वेगवेगळे मसुदे कॅबिनेटकडे पाठवले जातील किंवा एकाच मसुद्यात वादग्रस्त मुद्द्यांवर दोन पर्याय देऊन हा मसुदा कॅबिनेटकडे पाठवला जाईल. दरम्यान, शेवटच्या बैठकीआधी काही वेळापूर्वी पंतप्रधानांनी लोकपाल समितीतल्या मंत्र्यांची बैठक घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2011 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close