S M L

ज्येष्ठ अर्थतज्ञ सुरेश तेंडुलकर यांचे निधन

21 जूनजेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार सुरेश तेंडुलकर यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. जानेवारी 2005 पासून ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये होते. जगभरामध्ये मंदी सुरू असताना भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा फारसा परिणाम होऊ नये किंवा महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकारला मार्गदर्शन केलं होतं. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षं काम केलं. तर 1995 ते 1998 याकाळात ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक होते. 1960 मध्ये पुण्यातून पदवी आणि 1962 मध्ये दिल्लीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हसिटीमध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. केंद्र सरकारसाठी अर्थव्यवस्थेशी संबंधी वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलं. भारतीय अर्थव्यवस्था आणि या अर्थव्यवस्थेची प्रगती आणि त्यातल्या अडचणींविषयी तेंडुलकरांनी लिखाण केलं. 1996 मध्ये निर्गुंतवणुकीविषयी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीचेही ते सदस्य होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2011 10:08 AM IST

ज्येष्ठ अर्थतज्ञ सुरेश तेंडुलकर यांचे निधन

21 जून

जेष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी प्रमुख आर्थिक सल्लागार सुरेश तेंडुलकर यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. जानेवारी 2005 पासून ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीमध्ये होते. जगभरामध्ये मंदी सुरू असताना भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा फारसा परिणाम होऊ नये किंवा महागाई आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकारला मार्गदर्शन केलं होतं.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षं काम केलं. तर 1995 ते 1998 याकाळात ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक होते. 1960 मध्ये पुण्यातून पदवी आणि 1962 मध्ये दिल्लीतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिव्हसिटीमध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली.

केंद्र सरकारसाठी अर्थव्यवस्थेशी संबंधी वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलं. भारतीय अर्थव्यवस्था आणि या अर्थव्यवस्थेची प्रगती आणि त्यातल्या अडचणींविषयी तेंडुलकरांनी लिखाण केलं. 1996 मध्ये निर्गुंतवणुकीविषयी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीचेही ते सदस्य होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2011 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close