S M L

रायगडावर सापडल्या 300 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ वस्तू

मोहन जाधव, रायगड21 जूनरायगड किल्ल्यावर साडे तिनशे वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ वस्तू आढळून आल्या आहेत. गडावरील प्राचीन वाड्यांच्या पडक्या भिंतींचे पुर्नबांधणीचे काम सध्या पुरातत्व विभागाकडून केले जात आहे. हे काम करत असतांना 300 वर्षापूर्वीच्या अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्या आहेत.शिवकालापासून सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला किल्ले रायगड. रायगडाला पुन्हा एकदा ऐतिहासिक वैभव प्राप्त व्हावे म्हणून पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू केलं. या अंतर्गत, गडावरच्या जुन्या, पडक्या वाड्याच्या भिंतींच्या जतनाचं काम सुरू आहे. याच कामात गडावर मोठ्या प्रमाणात शिवकालीन वस्तूही सापडल्या आहेत. यात काही प्राचीन मूतीर्ंचाही समावेश आहे. त्याचबरोबर शिवकालीन भांडी, कौलं, दुर्मिळ आणि धारधार शस्त्रे, तोफ-गोळे तसेच भूसुरुंगही सापडले आहेत. नाटे नामक घातक शस्त्राचाही यात समावेश आहे.शिवरायांचा पराक्रम, आठवणी आणि इतिहास यांची साक्ष देणार्‍या या वस्तू आहेत आणि म्हणूनच या अनमोल वस्तूंचं संवर्धन होणं गरजेचं आहे. यापुढील काळात गडावर आणखीनही अशा शिवकालीन वस्तू सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वस्तूंचं एक सुसज्ज संग्रहालय गडावर उभारण्याची मागणी इथे येणार्‍या पर्यटकांकडून केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2011 11:19 AM IST

रायगडावर सापडल्या 300 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ वस्तू

मोहन जाधव, रायगड

21 जून

रायगड किल्ल्यावर साडे तिनशे वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ वस्तू आढळून आल्या आहेत. गडावरील प्राचीन वाड्यांच्या पडक्या भिंतींचे पुर्नबांधणीचे काम सध्या पुरातत्व विभागाकडून केले जात आहे. हे काम करत असतांना 300 वर्षापूर्वीच्या अनेक दुर्मिळ वस्तू सापडल्या आहेत.

शिवकालापासून सह्याद्रीच्या रांगांमध्ये उभा असलेला किल्ले रायगड. रायगडाला पुन्हा एकदा ऐतिहासिक वैभव प्राप्त व्हावे म्हणून पुरातत्त्व खात्याने या किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू केलं. या अंतर्गत, गडावरच्या जुन्या, पडक्या वाड्याच्या भिंतींच्या जतनाचं काम सुरू आहे.

याच कामात गडावर मोठ्या प्रमाणात शिवकालीन वस्तूही सापडल्या आहेत. यात काही प्राचीन मूतीर्ंचाही समावेश आहे. त्याचबरोबर शिवकालीन भांडी, कौलं, दुर्मिळ आणि धारधार शस्त्रे, तोफ-गोळे तसेच भूसुरुंगही सापडले आहेत. नाटे नामक घातक शस्त्राचाही यात समावेश आहे.

शिवरायांचा पराक्रम, आठवणी आणि इतिहास यांची साक्ष देणार्‍या या वस्तू आहेत आणि म्हणूनच या अनमोल वस्तूंचं संवर्धन होणं गरजेचं आहे. यापुढील काळात गडावर आणखीनही अशा शिवकालीन वस्तू सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या वस्तूंचं एक सुसज्ज संग्रहालय गडावर उभारण्याची मागणी इथे येणार्‍या पर्यटकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2011 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close