S M L

तुकोबांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

22 जूनतुकोबांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान सुरू झालं आहे. वारकर्‍यांची पाऊले आता विठ्‌ठलाच्या पंढरीकडे निघाले आहे. या प्रस्थानासाठी अनेक वारकरी आपल्या दिंड्यांसह देहूत दाखल झाले आहे. पहाटे काकड आरती झाली. दुपारी महापूजा होऊन अडीचच्या नंतर पालखीचं प्रस्थान झालं. संत तुकाराम महाराज देवस्थान, तुकाराम वैकुंठ गमन परिसर आणि संपूर्ण देहुगाव वारीसाठी सज्ज झालं होतं. तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा या वर्षीचा हा 326 वा सोहळा आहे. महाराजांच्या पालखी सोबत राज्यातून आलेल्या 275 दिंड्या यात सामील झाल्या आहे. झळाळी दिलेला रथ आता प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज आहे. तब्बल 200 किलो चांदीपासून बनवण्यात आलेला हा पालखी रथ सर्वांचं लक्ष वेधुन घेतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 11:35 AM IST

तुकोबांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

22 जून

तुकोबांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान सुरू झालं आहे. वारकर्‍यांची पाऊले आता विठ्‌ठलाच्या पंढरीकडे निघाले आहे. या प्रस्थानासाठी अनेक वारकरी आपल्या दिंड्यांसह देहूत दाखल झाले आहे. पहाटे काकड आरती झाली. दुपारी महापूजा होऊन अडीचच्या नंतर पालखीचं प्रस्थान झालं.

संत तुकाराम महाराज देवस्थान, तुकाराम वैकुंठ गमन परिसर आणि संपूर्ण देहुगाव वारीसाठी सज्ज झालं होतं. तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा या वर्षीचा हा 326 वा सोहळा आहे. महाराजांच्या पालखी सोबत राज्यातून आलेल्या 275 दिंड्या यात सामील झाल्या आहे. झळाळी दिलेला रथ आता प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज आहे. तब्बल 200 किलो चांदीपासून बनवण्यात आलेला हा पालखी रथ सर्वांचं लक्ष वेधुन घेतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close