S M L

टीम इंडियाचे कसोटी सामन्यावर वर्चस्व

22 जूनवेस्ट इंडिज येथे जमैका टेस्टच्या दुसर्‍या दिवशी भारताने टेस्टवर चांगलंय वर्चस्व मिळवले आहे. आधी भारतीय बॉलर्सनी विंडीजची पहिली इनिंग 173 रनमध्ये गुंडाळली. आणि त्यानंतर दुसर्‍या इनिंगमध्ये तीन विकेटवर 91 रन केलेत. त्यामुळे भारतीय टीमकडे आता एकूण 164 रनची आघाडी आहे. सबायना पार्कच्या पिचवर स्पीनर्स यशस्वी ठरतील असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात भारतासाठी हीरो ठरले ते ईशांत आणि प्रवीण कुमार. दोघांनी कालच्या पहिल्याच सेशनमध्ये पहिल्या पाच विकेट मिळवल्या. आणि या धक्क्यातून विंडीज टीम सावरली नाही. लंचला त्यांची अवस्था पाच विकेटवर 119 अशी होती. त्यानंतरच्या सेशनमध्ये हरभजन आणि मिश्रा यांनी धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून आणखी 54 रनमध्येच विंडीजची इनिंग गुंडाळली. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 73 रनची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारताच्या दुसर्‍या इनिंगची सुरुवातही खराब झाली. दुसर्‍याच ओव्हरमध्ये मुरली विजय आऊट झाला. तर लक्ष्मणही डकवर आऊट झाला. पण द वॉल राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी अधिक पडझड टाळली. आणि चौथ्या विकेटसाठी नॉटआऊट 34 रनची पार्टनरशिप केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 12:05 PM IST

टीम इंडियाचे कसोटी सामन्यावर वर्चस्व

22 जून

वेस्ट इंडिज येथे जमैका टेस्टच्या दुसर्‍या दिवशी भारताने टेस्टवर चांगलंय वर्चस्व मिळवले आहे. आधी भारतीय बॉलर्सनी विंडीजची पहिली इनिंग 173 रनमध्ये गुंडाळली. आणि त्यानंतर दुसर्‍या इनिंगमध्ये तीन विकेटवर 91 रन केलेत. त्यामुळे भारतीय टीमकडे आता एकूण 164 रनची आघाडी आहे.

सबायना पार्कच्या पिचवर स्पीनर्स यशस्वी ठरतील असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात भारतासाठी हीरो ठरले ते ईशांत आणि प्रवीण कुमार. दोघांनी कालच्या पहिल्याच सेशनमध्ये पहिल्या पाच विकेट मिळवल्या. आणि या धक्क्यातून विंडीज टीम सावरली नाही. लंचला त्यांची अवस्था पाच विकेटवर 119 अशी होती.

त्यानंतरच्या सेशनमध्ये हरभजन आणि मिश्रा यांनी धुमाकूळ घातला. दोघांनी मिळून आणखी 54 रनमध्येच विंडीजची इनिंग गुंडाळली. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 73 रनची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. त्यानंतर भारताच्या दुसर्‍या इनिंगची सुरुवातही खराब झाली.

दुसर्‍याच ओव्हरमध्ये मुरली विजय आऊट झाला. तर लक्ष्मणही डकवर आऊट झाला. पण द वॉल राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी अधिक पडझड टाळली. आणि चौथ्या विकेटसाठी नॉटआऊट 34 रनची पार्टनरशिप केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close