S M L

पुण्यात उपप्राचार्याची प्राचार्यांना शिवीगाळ

22 जूनपुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेज अर्थात एस.पी. कॉलेज मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. कला विभागाचे उपप्राचार्य सुभाष खंडागळे यांनी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करत प्राचार्य आणि इतर कर्मचारी संपावर गेले आहे. प्राध्यापक प्रवीण रणसुरे आणि प्राध्यापिका सरोज हिरेमठ यांना गैरवर्तणुक आणि गैरव्यवहारप्रकरणी प्राचार्य शेठ यांनी पदमुक्त करण्याची कारवाई केली. याचा राग येऊन खंडागळे यांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करत सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी बंद पुकारला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाकडे कॉलेजचं व्यवस्थापन असून संस्थेनंही या कारवाईला पाठिंबा दिल्याचे प्राचार्यांनी सांगितले आहे. सुभाष खंडागळे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी संस्थेचे प्रमुख अभय दाढे यांना भेटून आपण बाजू मांडू आणि त्यानंतरच प्रसारमाध्यमांशी बोलू असं सांगून प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. 10 वी 12 वीचे निकाल नुकतेच लागून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असतानाच सुरू झालेल्या या बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2011 01:39 PM IST

पुण्यात उपप्राचार्याची प्राचार्यांना शिवीगाळ

22 जून

पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेज अर्थात एस.पी. कॉलेज मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. कला विभागाचे उपप्राचार्य सुभाष खंडागळे यांनी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करत प्राचार्य आणि इतर कर्मचारी संपावर गेले आहे.

प्राध्यापक प्रवीण रणसुरे आणि प्राध्यापिका सरोज हिरेमठ यांना गैरवर्तणुक आणि गैरव्यवहारप्रकरणी प्राचार्य शेठ यांनी पदमुक्त करण्याची कारवाई केली. याचा राग येऊन खंडागळे यांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करत सर्व शिक्षक आणि कर्मचार्‍यांनी बंद पुकारला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाकडे कॉलेजचं व्यवस्थापन असून संस्थेनंही या कारवाईला पाठिंबा दिल्याचे प्राचार्यांनी सांगितले आहे.

सुभाष खंडागळे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी संस्थेचे प्रमुख अभय दाढे यांना भेटून आपण बाजू मांडू आणि त्यानंतरच प्रसारमाध्यमांशी बोलू असं सांगून प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. 10 वी 12 वीचे निकाल नुकतेच लागून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असतानाच सुरू झालेल्या या बंदचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याशिवाय राहणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2011 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close