S M L

तुकोबांच्या पालखीचे आकुर्डीच्या मुक्कामासाठी प्रस्थान

23 जूनतुकोबांच्या पालखीचे आज इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले आहे. तुकाराम महाराजांची पालखी अंगणशहा बाबा दर्ग्यात दाखल झाली. इथं पालखीची पहिली आरती झाली. पालखी आता आकुर्डीच्या मुक्कामासाठी निघाली आहे. बुधवारी देहूमधून तुकोबाच्या पालखीचे प्रस्थान झालं. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखीने इनामदार वाड्यात पहिला मुक्काम केला. हया वाड्यातच त्यांचा जन्म झाला असं मानतात. वारकर्‍यांची पाऊले आता विठ्‌ठलाच्या पंढरीकडे निघाले आहे. या प्रस्थानासाठी अनेक वारकरी आपल्या दिंड्यांसह देहूत दाखल झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा या वर्षीचा हा 326 वा सोहळा आहे. महाराजांच्या पालखी सोबत राज्यातून आलेल्या 275 दिंड्या यात सामील झाल्या आहे. यंदा पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडला महाराजांच्या पालखीतलं पहिलं रिंगण होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 09:56 AM IST

तुकोबांच्या पालखीचे आकुर्डीच्या मुक्कामासाठी प्रस्थान

23 जून

तुकोबांच्या पालखीचे आज इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले आहे. तुकाराम महाराजांची पालखी अंगणशहा बाबा दर्ग्यात दाखल झाली. इथं पालखीची पहिली आरती झाली. पालखी आता आकुर्डीच्या मुक्कामासाठी निघाली आहे. बुधवारी देहूमधून तुकोबाच्या पालखीचे प्रस्थान झालं.

मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखीने इनामदार वाड्यात पहिला मुक्काम केला. हया वाड्यातच त्यांचा जन्म झाला असं मानतात. वारकर्‍यांची पाऊले आता विठ्‌ठलाच्या पंढरीकडे निघाले आहे.

या प्रस्थानासाठी अनेक वारकरी आपल्या दिंड्यांसह देहूत दाखल झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा या वर्षीचा हा 326 वा सोहळा आहे. महाराजांच्या पालखी सोबत राज्यातून आलेल्या 275 दिंड्या यात सामील झाल्या आहे. यंदा पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडला महाराजांच्या पालखीतलं पहिलं रिंगण होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close