S M L

आळंदीत वारीची लगबग सुरू

23 जूनथोर बहु ती आळंदी, थोर बहू तो ज्ञानिया सुखाचे आगर, पाठीराखा विठूरायाज्ञानियाच्या आळंदीत वारीची लगबग सुरू झाली आहे. इंद्रायणीसह अवघी आळंदी आता वारकर्‍यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आज रात्री 10 वाजता म्हणजे ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. त्यासाठी माऊली मंदिरात सेवेकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. पालखीसाठीच्या मानाच्या बैलजोड्याही तयार आहेत. आळंदीची दुकानंही धार्मिक, वारकरी संप्रदायासाठी लागणार्‍या वस्तूंनी सजली आहे. तुळशीमाळा, टाळ, मृदुंग, बुक्का, चंदनवाट्या यांनी दुकानं भरली आहे. आता आळंदीला वाट आहे ती माऊली माऊलीचा गजर करत धावत येणार्‍या भान हरपून नाचणार्‍या साध्या भोळ्या वारकर्‍यांची...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 10:11 AM IST

आळंदीत वारीची लगबग सुरू

23 जून

थोर बहु ती आळंदी, थोर बहू तो ज्ञानिया सुखाचे आगर, पाठीराखा विठूराया

ज्ञानियाच्या आळंदीत वारीची लगबग सुरू झाली आहे. इंद्रायणीसह अवघी आळंदी आता वारकर्‍यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. आज रात्री 10 वाजता म्हणजे ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

त्यासाठी माऊली मंदिरात सेवेकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. पालखीसाठीच्या मानाच्या बैलजोड्याही तयार आहेत. आळंदीची दुकानंही धार्मिक, वारकरी संप्रदायासाठी लागणार्‍या वस्तूंनी सजली आहे. तुळशीमाळा, टाळ, मृदुंग, बुक्का, चंदनवाट्या यांनी दुकानं भरली आहे. आता आळंदीला वाट आहे ती माऊली माऊलीचा गजर करत धावत येणार्‍या भान हरपून नाचणार्‍या साध्या भोळ्या वारकर्‍यांची...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close