S M L

ठाण्यात पुजार्‍यांचे आंदोलन ; घर खाली केल्याचा आरोप

23 जूनठाणे जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या गणेशपुरीमधील भीमेश्वर सदगुरू नित्यानंद संस्थान आणि कर्मचार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. जुन्या पुजार्‍यांना कामावरुन काढून टाकून त्यांची घर जबरदस्तीने खाली केल्याचा आरोप जुने पुजारी करत आहे. याविरोधात श्रमजीवी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. जुन्या पुजार्‍यांनी न्याय मिळाला नाही तर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ट्रस्टींशी संपर्क साधला असता ज्या पुजार्‍यांकडे स्वतःची घरे आहेत आणि ज्यांनी ही घरं भाड्याने दिली त्यांनाच घरे खाली करायला सांगितल्याचं म्हटले आहे.वसई तालुक्यतील गणेशपुरी येथील भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थांच्या ट्रस्टीनी जुन्या पुजार्‍यांना कामावरुन काढुन टाकले. यामुळे श्रमजीवी संघटनेने ट्रस्टी विरोधात आंदोलन केले.न्याय न मिळाल्यास उपोषण व आत्मदहनाचा इशारा पुजार्‍यांनी दिला. वसई तालुक्यातील गणेशपुरी येथील भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थांच्या ट्रस्टी ने आमची घरे जबरदस्तीने खाली करुन त्याला ताळे ठोकले.आणि शौचालयाची दारे तोडण्यात आली. पूर्व परंपरागत चालत आलेला नैवेद्य बंद केला आहे.आणि जुन्या कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप पुजार्‍यांनी केला आहे.दरम्यान भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थानच्या ट्रस्टी डॉ.किशोर भोईर यांच्याशी संपर्क केला असता. ज्या पुजार्‍यांकडे स्वतःची घरे आहेत व ज्यांनी घरे भाड्याने दिली आहेत त्यांनाच घरे खाली करण्यास सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 08:16 AM IST

ठाण्यात पुजार्‍यांचे आंदोलन ; घर खाली केल्याचा आरोप

23 जून

ठाणे जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या गणेशपुरीमधील भीमेश्वर सदगुरू नित्यानंद संस्थान आणि कर्मचार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. जुन्या पुजार्‍यांना कामावरुन काढून टाकून त्यांची घर जबरदस्तीने खाली केल्याचा आरोप जुने पुजारी करत आहे.

याविरोधात श्रमजीवी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. जुन्या पुजार्‍यांनी न्याय मिळाला नाही तर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, ट्रस्टींशी संपर्क साधला असता ज्या पुजार्‍यांकडे स्वतःची घरे आहेत आणि ज्यांनी ही घरं भाड्याने दिली त्यांनाच घरे खाली करायला सांगितल्याचं म्हटले आहे.

वसई तालुक्यतील गणेशपुरी येथील भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थांच्या ट्रस्टीनी जुन्या पुजार्‍यांना कामावरुन काढुन टाकले. यामुळे श्रमजीवी संघटनेने ट्रस्टी विरोधात आंदोलन केले.न्याय न मिळाल्यास उपोषण व आत्मदहनाचा इशारा पुजार्‍यांनी दिला.

वसई तालुक्यातील गणेशपुरी येथील भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थांच्या ट्रस्टी ने आमची घरे जबरदस्तीने खाली करुन त्याला ताळे ठोकले.आणि शौचालयाची दारे तोडण्यात आली. पूर्व परंपरागत चालत आलेला नैवेद्य बंद केला आहे.आणि जुन्या कर्मचार्यांना कामावरुन कमी करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप पुजार्‍यांनी केला आहे.

दरम्यान भीमेश्वर सदगुरु नित्यानंद संस्थानच्या ट्रस्टी डॉ.किशोर भोईर यांच्याशी संपर्क केला असता. ज्या पुजार्‍यांकडे स्वतःची घरे आहेत व ज्यांनी घरे भाड्याने दिली आहेत त्यांनाच घरे खाली करण्यास सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 08:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close