S M L

मुंडेंचं राजकारण या वयात न शोभणारे - राज ठाकरे

23 जूनभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण हे या वयात न शोभणारे आहे. ते भाजपचे नेते आहेत की सर्वपक्षीय नेते आहेत याचा त्यांनी विचार करावा अशी टीका महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा एकीकडे सुरू होती तर दुसरीकडे आपण आपण पराकोटीचे नाराज आहोत आपल्याकडे सर्व पर्याय खुले आहे असं सागणारे गोपीनाथ मुंडे यांनी काल दिल्लीत सुषमा स्वराज यांची भेट घेऊन आपण भाजपमध्येच राहणार आहे असं स्पष्ट केलं आणि 'मुंडेंचं बंड' या नाट्यावर खुद्द पडदा टाकला. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंडेंचा समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, मुंडेंचं बंड फिल्म मेकिंगच्या भाषेत सांगणं झालं तर अगोदर प्रोडक्शन केलं आणि नंतर शुटिंग करायला सुरूवात केली. जर आपण नाराज आहोत तर हे अगोदर पक्षश्रेष्ठींना सांगितले पाहिजे. मग बंड पुकारला असता तर याला काही अर्थ असता. पण या बंडाला ना आकार ना उकार होता. मुंडे तसे खूप मोठे मास नेते आहे त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. ते नाराज होते तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि इतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली. यानंतर ही त्यांचं समाधान होत नाही आणि काल सुषमा स्वराज यांच्याकडे जाऊन आपलं समाधान झालं आहे असं सांगणं मुंडेंच्या वयाला शोभत नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली. तसेच यासगळ्या गोष्टीचा परिणाम भाजपच्या तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. आणि हे काय फेव्हिकॉल नाही चिपकवलं कि संपलं. हे इतक्या लवकर संपणार नाही. भाजपच्या अंतर्गत तडा गेला आहे हे नक्की आहे असं मत ही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 01:49 PM IST

मुंडेंचं राजकारण या वयात न शोभणारे - राज ठाकरे

23 जून

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण हे या वयात न शोभणारे आहे. ते भाजपचे नेते आहेत की सर्वपक्षीय नेते आहेत याचा त्यांनी विचार करावा अशी टीका महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा एकीकडे सुरू होती तर दुसरीकडे आपण आपण पराकोटीचे नाराज आहोत आपल्याकडे सर्व पर्याय खुले आहे असं सागणारे गोपीनाथ मुंडे यांनी काल दिल्लीत सुषमा स्वराज यांची भेट घेऊन आपण भाजपमध्येच राहणार आहे असं स्पष्ट केलं आणि 'मुंडेंचं बंड' या नाट्यावर खुद्द पडदा टाकला.

आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंडेंचा समाचार घेतला. राज ठाकरे म्हणाले की, मुंडेंचं बंड फिल्म मेकिंगच्या भाषेत सांगणं झालं तर अगोदर प्रोडक्शन केलं आणि नंतर शुटिंग करायला सुरूवात केली. जर आपण नाराज आहोत तर हे अगोदर पक्षश्रेष्ठींना सांगितले पाहिजे. मग बंड पुकारला असता तर याला काही अर्थ असता. पण या बंडाला ना आकार ना उकार होता.

मुंडे तसे खूप मोठे मास नेते आहे त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. ते नाराज होते तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि इतर पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत काढली. यानंतर ही त्यांचं समाधान होत नाही आणि काल सुषमा स्वराज यांच्याकडे जाऊन आपलं समाधान झालं आहे असं सांगणं मुंडेंच्या वयाला शोभत नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

तसेच यासगळ्या गोष्टीचा परिणाम भाजपच्या तळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. आणि हे काय फेव्हिकॉल नाही चिपकवलं कि संपलं. हे इतक्या लवकर संपणार नाही. भाजपच्या अंतर्गत तडा गेला आहे हे नक्की आहे असं मत ही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close