S M L

पंढरीला जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या

23 जूनप्रत्येकालाच पायी वारीला जाणं शक्य होतंच असं नाही. अनेकजण एसटीनं पंढरीला जातात त्यासाठी आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार्‍या भक्तांसाठी राज्यभरातून विशेष एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत. 7 ते 16 जुलैैदरम्यान एकूण 2,990 गाड्या सोडल्या जाणार आहेत. याशिवाय 500 अतिरिक्त बसेसही सोडल्या णार आहेत. अमरावतीतून 400, औरंगाबादहून साडे आठशे, नागपूरहून साठ, पुण्यातून 830, नाशिकहून 700 तर मुंबईतून दीडशे विशेष गाड्या सोडल्या जातील. यात्रेनिमित्त पंढरपूरला चंद्रभागानगर यात्रा बस स्थानकही उभारण्यात येणार आहे. स्थानक परिसरात भक्तांसाठी वैद्यकिय मदत केंद्रे, उपहारगृहे , विश्रांती कक्ष , पिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यात्रा संपल्यानंतर पंढपूरहून आळंदी , देहू तुळजापूर , शनिशिंगणापूर येथे जाणार्‍या भक्तांसाठी खास बसेसची व्यवस्थाही केली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2011 06:44 PM IST

पंढरीला जाण्यासाठी एसटीच्या जादा गाड्या

23 जून

प्रत्येकालाच पायी वारीला जाणं शक्य होतंच असं नाही. अनेकजण एसटीनं पंढरीला जातात त्यासाठी आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार्‍या भक्तांसाठी राज्यभरातून विशेष एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत. 7 ते 16 जुलैैदरम्यान एकूण 2,990 गाड्या सोडल्या जाणार आहेत. याशिवाय 500 अतिरिक्त बसेसही सोडल्या णार आहेत.

अमरावतीतून 400, औरंगाबादहून साडे आठशे, नागपूरहून साठ, पुण्यातून 830, नाशिकहून 700 तर मुंबईतून दीडशे विशेष गाड्या सोडल्या जातील. यात्रेनिमित्त पंढरपूरला चंद्रभागानगर यात्रा बस स्थानकही उभारण्यात येणार आहे. स्थानक परिसरात भक्तांसाठी वैद्यकिय मदत केंद्रे, उपहारगृहे , विश्रांती कक्ष , पिण्याचे पाणी आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यात्रा संपल्यानंतर पंढपूरहून आळंदी , देहू तुळजापूर , शनिशिंगणापूर येथे जाणार्‍या भक्तांसाठी खास बसेसची व्यवस्थाही केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2011 06:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close