S M L

महागाईचा भडका ; डिझेल,सिलेंडर महाग

25 जून'महंगाई डायन खाय जात है' या गाण्याची चाल आता सरकार सर्व सामान्य माणसांच्या दैनदिन जिवनाशी जोडू पाहत आहे. पेट्रोलच्या किंमतीत 5 रूपयाने वाढ करून सरकारने दम धरला नसता तोच सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे. डिझेलच्या किमंतीत दर लिटरमागे 3 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती गॅस तब्बल 50 रुपयांनी महागला आहे. तर केरोसीनच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही वाढ साधारण असल्याचे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी म्हटलं आहे. डिझेलच्या आयात करात 5 टक्क्यांची कपात करण्यात आली. मुंबईत सध्या डिजेलचा दर लिटरमागे 42 रुपये 06 पैसे आहे. तो आता 45 रुपये 06 पैसे होणार आहे. आज दिल्लीत मंत्रिगटाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डिझेलच्या किमतीत प्रती लिटर 3 रुपये, रॉकेलच्या दरात प्रती लिटर 2 रुपये तर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या सरकारला स्वयंपाकाच्या गॅससाठी प्रति सिलेंडर 401 रुपये, डिझेलसाठी प्रति लिटर 14 रुपये आणि रॉकेलसाठी प्रति लिटर 27 रुपये सबसिडीसाठी मोजावे लागतात. केंद्र सरकारचा टप्प्याटप्याने ही सबसिडी कमी करण्याचा विचार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 09:35 AM IST

महागाईचा भडका ; डिझेल,सिलेंडर महाग

25 जून

'महंगाई डायन खाय जात है' या गाण्याची चाल आता सरकार सर्व सामान्य माणसांच्या दैनदिन जिवनाशी जोडू पाहत आहे. पेट्रोलच्या किंमतीत 5 रूपयाने वाढ करून सरकारने दम धरला नसता तोच सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे. डिझेलच्या किमंतीत दर लिटरमागे 3 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती गॅस तब्बल 50 रुपयांनी महागला आहे.

तर केरोसीनच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. मंत्रिगटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही वाढ साधारण असल्याचे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांनी म्हटलं आहे. डिझेलच्या आयात करात 5 टक्क्यांची कपात करण्यात आली. मुंबईत सध्या डिजेलचा दर लिटरमागे 42 रुपये 06 पैसे आहे. तो आता 45 रुपये 06 पैसे होणार आहे.

आज दिल्लीत मंत्रिगटाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डिझेलच्या किमतीत प्रती लिटर 3 रुपये, रॉकेलच्या दरात प्रती लिटर 2 रुपये तर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या सरकारला स्वयंपाकाच्या गॅससाठी प्रति सिलेंडर 401 रुपये, डिझेलसाठी प्रति लिटर 14 रुपये आणि रॉकेलसाठी प्रति लिटर 27 रुपये सबसिडीसाठी मोजावे लागतात. केंद्र सरकारचा टप्प्याटप्याने ही सबसिडी कमी करण्याचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close