S M L

भ्रष्टाचार्‍यांना मनसेचा कायम विरोध - राज ठाकरे

24 जूनमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. लाचखोर अधिकारी सुनील जोशी याला सेवेत परत आणण्याचा प्रस्ताव मांडणार्‍या महापौर वैजयंती घोलप यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. एखाद्या मनसे नगरसेवकानं अतिक्रमण केलं असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली. भ्रष्टाचार्‍यांना मनसे कधीही पाठिशी घालणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.त्याबरोबरच राज यांनी आपल्या नगरसेवकांचीही झाडाझडती घेतली. विरोधक काय चीज आहे, हे माझे नगरसेवक लवकरच दाखवून देतील असं त्यांनी सांगितलं. काही नगरसेवकांच्या कामावर मी समाधानी आहे. पण काहींबाबत असामाधानी आहे. त्यामुळे येत्या 29, 30 जूनला मुंबईमध्ये मनसेच्या नगरसेवकांची आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलंय. ब दर्जामधून ड दर्जामध्ये गेलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये निदान क दर्जापर्यंत सुधारणा करण्याचे प्राथमिक टार्गेट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 05:01 PM IST

भ्रष्टाचार्‍यांना मनसेचा कायम विरोध - राज ठाकरे

24 जून

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. लाचखोर अधिकारी सुनील जोशी याला सेवेत परत आणण्याचा प्रस्ताव मांडणार्‍या महापौर वैजयंती घोलप यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. एखाद्या मनसे नगरसेवकानं अतिक्रमण केलं असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली. भ्रष्टाचार्‍यांना मनसे कधीही पाठिशी घालणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्याबरोबरच राज यांनी आपल्या नगरसेवकांचीही झाडाझडती घेतली. विरोधक काय चीज आहे, हे माझे नगरसेवक लवकरच दाखवून देतील असं त्यांनी सांगितलं. काही नगरसेवकांच्या कामावर मी समाधानी आहे. पण काहींबाबत असामाधानी आहे. त्यामुळे येत्या 29, 30 जूनला मुंबईमध्ये मनसेच्या नगरसेवकांची आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलंय. ब दर्जामधून ड दर्जामध्ये गेलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेमध्ये निदान क दर्जापर्यंत सुधारणा करण्याचे प्राथमिक टार्गेट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close