S M L

सचिनने फेरारी विकली

24 जूनमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नऊ वर्षांपूर्वी भेट म्हणून मिळालेली "360 मोडेना" फेरारी कार आता सुरतच्या रस्त्यावर दिसणार आहे. ही कार सुरतच्या एका व्यावसायिकानं खरेदी केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर क्रिकेटच्या मैदानावर दमदार फटकेबाजी करतोच तर मैदानाबाहेर ही आपल्या कलागुणामुळे तो सदैव चर्चेत असतो. सचिनचं मोटार प्रेम हे त्यापैकी एक. फियाट कंपनीने वेगाचा बादशहा मायकल शुमाकर यांच्या हस्ते ब्रिटनमध्ये ''360 माडेना''फेरारी ही लाल वेगवान परीसचिनला भेट दिली होती. डॉन ब्रॅडमन यांच्या 29 टेस्ट सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केल्याबद्दल फिएटने सचिनला ही कार भेट म्हणून जाहीर केली होती. या लाल परीची किंमत होती जवळपास 75 लाख आणि सचिनला ही कार भारतात आणण्यासाठी या कारवर एकूण एक कोटीचा कर अदा करावा लागत होता. या करात सूट देण्यात यावी अशी विनंती सरकारला केली होती. या प्रकरणावर चांगलाच वाद रंगला होता. पण जेव्हा ही कार मुंबईच्या रस्तावरून धावत होती तेव्हा मुंबईकरांचे डोळे दिपले होते. आता सचिनने ही कार विकली आणि ती आता गुजरातच्या गुळगुळीत रस्त्यांवर धावणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 12:11 PM IST

सचिनने फेरारी विकली

24 जून

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला नऊ वर्षांपूर्वी भेट म्हणून मिळालेली "360 मोडेना" फेरारी कार आता सुरतच्या रस्त्यावर दिसणार आहे. ही कार सुरतच्या एका व्यावसायिकानं खरेदी केली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर क्रिकेटच्या मैदानावर दमदार फटकेबाजी करतोच तर मैदानाबाहेर ही आपल्या कलागुणामुळे तो सदैव चर्चेत असतो. सचिनचं मोटार प्रेम हे त्यापैकी एक. फियाट कंपनीने वेगाचा बादशहा मायकल शुमाकर यांच्या हस्ते ब्रिटनमध्ये ''360 माडेना''फेरारी ही लाल वेगवान परीसचिनला भेट दिली होती.

डॉन ब्रॅडमन यांच्या 29 टेस्ट सेंच्युरीच्या रेकॉर्डची बरोबरी केल्याबद्दल फिएटने सचिनला ही कार भेट म्हणून जाहीर केली होती. या लाल परीची किंमत होती जवळपास 75 लाख आणि सचिनला ही कार भारतात आणण्यासाठी या कारवर एकूण एक कोटीचा कर अदा करावा लागत होता.

या करात सूट देण्यात यावी अशी विनंती सरकारला केली होती. या प्रकरणावर चांगलाच वाद रंगला होता. पण जेव्हा ही कार मुंबईच्या रस्तावरून धावत होती तेव्हा मुंबईकरांचे डोळे दिपले होते. आता सचिनने ही कार विकली आणि ती आता गुजरातच्या गुळगुळीत रस्त्यांवर धावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close