S M L

तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा आज संगम सोहळा

25 जूनआज पुण्यात संत तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांचा संगम होत आहे. हा संगम फक्त पुण्यात आणि वाखरीतच पाहायला मिळतो. या पालख्या पुण्यातल्या पासोड्या विठ्ठल मंदिरातून पुढे जातात.पुणे महापालिकेच्या हद्दीवर या दोन्ही पालख्यांचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.तर पुणेकरांचं भव्य स्वागत अनुभवल्यानंतर संतश्रेष्ठ तुकोबांची पालखी जिथं विसावते ते म्हणजे नाना पेठेतलं निवडुंगा विठोबा मंदिर. तुकोबांच्या स्वागतासाठी हे मंदिर सजलं आहे. भव्य कमानी आणि सजावट करून परिसर सजवण्यात आला आहे. रात्री 9 वाजता पालखीचे आगमन झाल्यावर फटाके वाजवून विठ्ठलनामाच्या गजरात पालखीचं स्वागत करण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 09:53 AM IST

तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा आज संगम सोहळा

25 जून

आज पुण्यात संत तुकाराम आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्यांचा संगम होत आहे. हा संगम फक्त पुण्यात आणि वाखरीतच पाहायला मिळतो. या पालख्या पुण्यातल्या पासोड्या विठ्ठल मंदिरातून पुढे जातात.पुणे महापालिकेच्या हद्दीवर या दोन्ही पालख्यांचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे.

तर पुणेकरांचं भव्य स्वागत अनुभवल्यानंतर संतश्रेष्ठ तुकोबांची पालखी जिथं विसावते ते म्हणजे नाना पेठेतलं निवडुंगा विठोबा मंदिर. तुकोबांच्या स्वागतासाठी हे मंदिर सजलं आहे. भव्य कमानी आणि सजावट करून परिसर सजवण्यात आला आहे. रात्री 9 वाजता पालखीचे आगमन झाल्यावर फटाके वाजवून विठ्ठलनामाच्या गजरात पालखीचं स्वागत करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close