S M L

पिंपरीत रंगला पहिला रिंगण सोहळा

24 जूनपिंपरी-चिंचवडमधल्या संत तुकारामनगर इथं तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा रंगला.एच. ए. ग्राऊंडवर तुकाराम महाराज पालखीचं हे पहिलं रिंगण रंगलं. पालखी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यादांच शहरात झालेल्या या रिंगण सोहळ्याने पिंपरी चिंचवडकरांना अनुपम्य सोहळ्याची अनुभूती दिली. आकुर्डीचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पिंपरी-चिंचवडकडे प्रस्थान ठेवलं ते रिंगण सोहळ्याच्या तयारीसाठीच.वारकर्‍यांसह भाविकांनी शिस्तीनं केलेल्या रिंगणात तुकोबांची पालखी विसावली तेव्हा तुकोबांच्या गजरान मैदान दुमदुमलं. अब्दागिर्‍या आणि छत्र चामरांसह पालखी विसावली आणि मग मानाच्या अश्वांनी रिंगणाला सुरुवात करताच आनंदाची, भक्तीची एक लहरच वारकर्‍यांमंध्ये पसरली. मग त्यामागे धावणारे वारकरी आणि हंडा डोक्यावर घेऊन धावणार्‍या वारकरी महिलांनीही मग रिंगण गाजवलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2011 03:23 PM IST

पिंपरीत रंगला पहिला रिंगण सोहळा

24 जून

पिंपरी-चिंचवडमधल्या संत तुकारामनगर इथं तुकोबांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा रंगला.एच. ए. ग्राऊंडवर तुकाराम महाराज पालखीचं हे पहिलं रिंगण रंगलं. पालखी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यादांच शहरात झालेल्या या रिंगण सोहळ्याने पिंपरी चिंचवडकरांना अनुपम्य सोहळ्याची अनुभूती दिली. आकुर्डीचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पिंपरी-चिंचवडकडे प्रस्थान ठेवलं ते रिंगण सोहळ्याच्या तयारीसाठीच.

वारकर्‍यांसह भाविकांनी शिस्तीनं केलेल्या रिंगणात तुकोबांची पालखी विसावली तेव्हा तुकोबांच्या गजरान मैदान दुमदुमलं. अब्दागिर्‍या आणि छत्र चामरांसह पालखी विसावली आणि मग मानाच्या अश्वांनी रिंगणाला सुरुवात करताच आनंदाची, भक्तीची एक लहरच वारकर्‍यांमंध्ये पसरली. मग त्यामागे धावणारे वारकरी आणि हंडा डोक्यावर घेऊन धावणार्‍या वारकरी महिलांनीही मग रिंगण गाजवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2011 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close