S M L

हरिनामाच्या गजरात पालखींचा संगम सोहळा

25 जूनज्ञानेश्वर माऊलीं...ज्ञानराज माऊली तुकारामचा गजर करत आणि हरिनामाच्या गजरात माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालाखीचा संगम सोहळा पुणेकरांनी अनुभवला. जुन्या मुंबई पुणे हायवेवर मरीआई गेटपाशी या पालख्यांचा संगम झाला. त्यावेळी एकच गजर करत वारकर्‍यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत. हा संगम फक्त पुण्यात आणि वाखरीतच पाहायला मिळतो. संगमानंतर पुण्यातल्या पासोड्या विठ्ठल मंदिरातून पुढे गेल्या. पुणे महापालिकेच्या हद्दीवर या दोन्ही पालख्यांचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.आता माऊलींची पालखी पासोड्या विठोबापाशी मुक्कामाला असेल. तर तुकोबारायांच्या पालखीचा मु्‌क्काम नाना पेठेतल्या निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. हे 2 दिवस पालख्या पुण्याचा पाहुणचार आटोपून पंढरीसाठी प्रस्थान ठेवतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 03:05 PM IST

हरिनामाच्या गजरात पालखींचा संगम सोहळा

25 जून

ज्ञानेश्वर माऊलीं...ज्ञानराज माऊली तुकारामचा गजर करत आणि हरिनामाच्या गजरात माऊलींच्या आणि तुकोबांच्या पालाखीचा संगम सोहळा पुणेकरांनी अनुभवला. जुन्या मुंबई पुणे हायवेवर मरीआई गेटपाशी या पालख्यांचा संगम झाला. त्यावेळी एकच गजर करत वारकर्‍यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झाल्या आहेत.

हा संगम फक्त पुण्यात आणि वाखरीतच पाहायला मिळतो. संगमानंतर पुण्यातल्या पासोड्या विठ्ठल मंदिरातून पुढे गेल्या. पुणे महापालिकेच्या हद्दीवर या दोन्ही पालख्यांचे पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.आता माऊलींची पालखी पासोड्या विठोबापाशी मुक्कामाला असेल. तर तुकोबारायांच्या पालखीचा मु्‌क्काम नाना पेठेतल्या निवडुंग्या विठोबा मंदिरात असेल. हे 2 दिवस पालख्या पुण्याचा पाहुणचार आटोपून पंढरीसाठी प्रस्थान ठेवतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close