S M L

मेखरीतल्या वळूचा मृत्यू

25 जून''काही करा पण,त्रास देणार वळू पकडून द्या'' अशी मागणी अजितदादांकडे करणार्‍या गावकर्‍यांना आता या वळूच्या तावडीतून कायमचीच सुटका मिळाली आहे. मागच्या शनिवारी टगेगिरी करणार्‍या या वळूला पकडण्यात यश आलं होतं पण काल त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. गावकर्‍यांनी आज वळूची मिरवणूक काढून ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या समोर त्याचं दफन केलं. बारामती जिल्ह्यातील मेखळी येथे या टगेखोर वळूने गावात धुडगूस घातला होता. या वळूने 16 बैलाचा जीव घेतला होता तर 50 हून अधिक बैलांना जखमी केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वळूला पकडून द्यावं असं साकडं गावकर्‍यांनी अजितदादांना घातलं होतं. गावकर्‍यांच्या या मागणीमुळे अजितदादांनीही आश्चर्य व्यक्त केलं. पण या वळूला पकडण्याचं आश्वासन ही दिलं.वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या पथकानं गेल्या शनिवारी वळूला पकडून गावकर्‍यांचा ताब्यात दिलं. मात्र वळूला पकडल्यानंतर त्याला वेसन आणि लोढणं घालण्यात आल्याने नीट चालता येत नव्हतं. त्यामुळे तो काही खातही नव्हता. शुक्रवारी ग्रामस्थांनी डॉक्टरांना बोलवून त्याच्यावर उपचार केले. मात्र आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतावस्थेत आढळला. गावकर्‍यांनी आज वळूची मिरवणूक काढून ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या समोर त्याचं दफन केलं. इतर बातम्या वळू पकडून द्या, थेट अजितदादांनाच साकडं

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2011 03:25 PM IST

मेखरीतल्या वळूचा मृत्यू

25 जून

''काही करा पण,त्रास देणार वळू पकडून द्या'' अशी मागणी अजितदादांकडे करणार्‍या गावकर्‍यांना आता या वळूच्या तावडीतून कायमचीच सुटका मिळाली आहे. मागच्या शनिवारी टगेगिरी करणार्‍या या वळूला पकडण्यात यश आलं होतं पण काल त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. गावकर्‍यांनी आज वळूची मिरवणूक काढून ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या समोर त्याचं दफन केलं.

बारामती जिल्ह्यातील मेखळी येथे या टगेखोर वळूने गावात धुडगूस घातला होता. या वळूने 16 बैलाचा जीव घेतला होता तर 50 हून अधिक बैलांना जखमी केलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वळूला पकडून द्यावं असं साकडं गावकर्‍यांनी अजितदादांना घातलं होतं. गावकर्‍यांच्या या मागणीमुळे अजितदादांनीही आश्चर्य व्यक्त केलं. पण या वळूला पकडण्याचं आश्वासन ही दिलं.

वनविभागाच्या कर्मचार्‍यांच्या पथकानं गेल्या शनिवारी वळूला पकडून गावकर्‍यांचा ताब्यात दिलं. मात्र वळूला पकडल्यानंतर त्याला वेसन आणि लोढणं घालण्यात आल्याने नीट चालता येत नव्हतं. त्यामुळे तो काही खातही नव्हता. शुक्रवारी ग्रामस्थांनी डॉक्टरांना बोलवून त्याच्यावर उपचार केले. मात्र आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतावस्थेत आढळला. गावकर्‍यांनी आज वळूची मिरवणूक काढून ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराच्या समोर त्याचं दफन केलं.

इतर बातम्या

वळू पकडून द्या, थेट अजितदादांनाच साकडं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2011 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close