S M L

एपीआय घोटाळा प्रकरणी 'एनओसी' न घेताच एमआयडीसीची मान्यता

26 जूनऔरंगाबादमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतील एपीआय कंपनीचा भूखंड घोटाळा आयबीएन लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आणखीही नवीन नवीन घोटाळे बाहेर पडत आहे. एपीआय कंपनीच्या भूखंडावर होत असलेले बांधकाम नियमबाह्य तर आहेच पण या बांधकामावर 20 लाख रुपयांचा कर माफ करण्यात आला आहे. या बांधकामालासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच एमआयडीसीने मान्यता दिली. आणखी एक धक्कादायक म्हणजे अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र औरंगाबाद नाही तर चक्क मुंबई अग्निशमन केंद्राकडून घेण्यात आलं. या भूखंडावर बांधलेला प्रोझोन मॉल आणि ब्लू वेल्स या निवासी वसाहतीला मालमत्ता कर आकारण्यात आलेला नाही. आयबीएन लोकमतच्या दणक्यानंतर आता महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 02:13 PM IST

एपीआय घोटाळा प्रकरणी 'एनओसी' न घेताच एमआयडीसीची मान्यता

26 जून

औरंगाबादमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतील एपीआय कंपनीचा भूखंड घोटाळा आयबीएन लोकमतने उघडकीस आणल्यानंतर आणखीही नवीन नवीन घोटाळे बाहेर पडत आहे. एपीआय कंपनीच्या भूखंडावर होत असलेले बांधकाम नियमबाह्य तर आहेच पण या बांधकामावर 20 लाख रुपयांचा कर माफ करण्यात आला आहे.

या बांधकामालासाठी महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच एमआयडीसीने मान्यता दिली. आणखी एक धक्कादायक म्हणजे अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र औरंगाबाद नाही तर चक्क मुंबई अग्निशमन केंद्राकडून घेण्यात आलं.

या भूखंडावर बांधलेला प्रोझोन मॉल आणि ब्लू वेल्स या निवासी वसाहतीला मालमत्ता कर आकारण्यात आलेला नाही. आयबीएन लोकमतच्या दणक्यानंतर आता महापालिकेने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close