S M L

मराठवाड्याकडे वरुणराजाने पाठ फिरवली ; शेतकरी राजा चिंतेत

26 जूनमराठवाड्यात मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने खरिप हंगाम धोक्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडा गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. पेरण्या जर वेळेवर झाल्या नाहीत तर उत्पादनात मोठी घट होणार आहे. उस्मानाबादमध्ये गेल्या वर्षी 25 जूनपर्यंत किमान 20% पेरण्या झाल्या होत्या. मात्र या वर्षी 4 लाख 40 हजार हेक्टर पेरणीस उपलब्ध असूनही पावसाने दांडी मारल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस अशी पिके घेतली जातात. मात्र पेरण्या जर वेळेवर झाल्या नाहीत तर घेण्यात येणार्‍या पिकात मोठी घट होईल असे अधिकारी सांगतात. मराठवाड्यात मुळातच सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍याला शेतीसाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. शेतकर्‍यांनी पेरणीसाठी खत बी बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी केले होते. मात्र पाऊस वेळेवर होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीसोबतच जनावरांच्या चार्‍याचीही चिंता त्याला सतावत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2011 02:21 PM IST

मराठवाड्याकडे वरुणराजाने पाठ फिरवली ; शेतकरी राजा चिंतेत

26 जून

मराठवाड्यात मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने खरिप हंगाम धोक्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडा गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. पेरण्या जर वेळेवर झाल्या नाहीत तर उत्पादनात मोठी घट होणार आहे. उस्मानाबादमध्ये गेल्या वर्षी 25 जूनपर्यंत किमान 20% पेरण्या झाल्या होत्या.

मात्र या वर्षी 4 लाख 40 हजार हेक्टर पेरणीस उपलब्ध असूनही पावसाने दांडी मारल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. मराठवाड्यात प्रामुख्याने तूर, सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस अशी पिके घेतली जातात. मात्र पेरण्या जर वेळेवर झाल्या नाहीत तर घेण्यात येणार्‍या पिकात मोठी घट होईल असे अधिकारी सांगतात.

मराठवाड्यात मुळातच सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍याला शेतीसाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. शेतकर्‍यांनी पेरणीसाठी खत बी बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी केले होते. मात्र पाऊस वेळेवर होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीसोबतच जनावरांच्या चार्‍याचीही चिंता त्याला सतावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2011 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close