S M L

निवडणुकीवरून दंगल घडवणारे आघाडीचे कार्यकर्ते मोकाट

27 जूनग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून दंगल माजवणारे मोखाड्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीन दिवसांनंतरही मोकाट आहेत. मतदानाच्या दिवशी मोखाडा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या दंगलीमध्ये कार्यकर्त्यांनी तुळ्याच्या पाड्यावर हल्ला केला होता. रस्त्यावर असलेला ट्रॅक्टर, ट्रक, मोटारसायकल, जीप, कार दिसेल ती गाडी कार्यकर्त्यांनी तोडली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरची कुरापत काढत गाड्यांची तोडफोड आणि हाणामारी केली. मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत पण अजूनही एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 12:03 PM IST

निवडणुकीवरून दंगल घडवणारे आघाडीचे कार्यकर्ते मोकाट

27 जून

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून दंगल माजवणारे मोखाड्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीन दिवसांनंतरही मोकाट आहेत. मतदानाच्या दिवशी मोखाडा तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या दंगलीमध्ये कार्यकर्त्यांनी तुळ्याच्या पाड्यावर हल्ला केला होता.

रस्त्यावर असलेला ट्रॅक्टर, ट्रक, मोटारसायकल, जीप, कार दिसेल ती गाडी कार्यकर्त्यांनी तोडली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरची कुरापत काढत गाड्यांची तोडफोड आणि हाणामारी केली. मोखाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत पण अजूनही एकालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close