S M L

अंपायर रेफरल प्रणालीला आयसीसीचा ग्रीन सिग्नल

27 जूनआयसीसीने अखेर अंपायर रेफरल प्रणाली अर्थात युडीआरएस वापरणे अनिवार्य केलं आहे. पण यात मेख अशी आहे की रेफरलसाठी हॉटस्पॉट आणि साऊंड ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. याचाच अर्थ फक्त कॅच योग्यरित्या पकडलाय की नाही याचाच निर्णय रेफरल प्रणालीने होऊ शकेल. एलबीडब्ल्यू विषयीच्या निर्णयांसाठी रेफरलचा वापर होऊ शकणार नाही. एलबीडब्ल्यू निर्णयांसाठी हॉक आय तंत्रज्ञान लागतं. आणि या तंत्रज्ञानाला बीसीसीआयचा विरोध आहे. त्यामुळे सध्यातरी रेफरल प्रणाली हॉकआय शिवायच वापरली जाणार आहे. आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा सध्या हाँगकाँगमध्ये सुरु आहे. आणि तिथंच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एक गोष्ट निश्चित झाली. भारताच्या आगामी इंग्लंड दौर्‍यात रेफरल प्रणाली आता वापरावीच लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 12:10 PM IST

अंपायर रेफरल प्रणालीला आयसीसीचा ग्रीन सिग्नल

27 जून

आयसीसीने अखेर अंपायर रेफरल प्रणाली अर्थात युडीआरएस वापरणे अनिवार्य केलं आहे. पण यात मेख अशी आहे की रेफरलसाठी हॉटस्पॉट आणि साऊंड ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. याचाच अर्थ फक्त कॅच योग्यरित्या पकडलाय की नाही याचाच निर्णय रेफरल प्रणालीने होऊ शकेल.

एलबीडब्ल्यू विषयीच्या निर्णयांसाठी रेफरलचा वापर होऊ शकणार नाही. एलबीडब्ल्यू निर्णयांसाठी हॉक आय तंत्रज्ञान लागतं. आणि या तंत्रज्ञानाला बीसीसीआयचा विरोध आहे. त्यामुळे सध्यातरी रेफरल प्रणाली हॉकआय शिवायच वापरली जाणार आहे. आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा सध्या हाँगकाँगमध्ये सुरु आहे. आणि तिथंच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एक गोष्ट निश्चित झाली. भारताच्या आगामी इंग्लंड दौर्‍यात रेफरल प्रणाली आता वापरावीच लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close