S M L

सावकारग्रस्त शेतकर्‍यांना स्वाभिमानी संघटनेचा मदतीचा हात

27 जूनविदर्भातील शेतकर्‍यांच्या जमिनी आजही सावकर्‍यांच्या ताब्यात आहेत. ह्या सावकरांच्या ताब्यातल्या जमिनी शेतकर्‍यांना परत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटननेने आंदोलन पुकारले आहे. संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष रविकांत तुपकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावकारांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. या आंदोलनात सावकाराच्या ताब्यातल्या शेतीचा ताबा घेऊन ह्या जमिनी शेतकर्‍यांच्या ताब्यात देण्याची मोहिम विदर्भात सुरू केली. राज्य सरकार विधानसभेत सावकारी कायदा आणण्याची शक्यता आहे. हा कायदा मंजूर झाला तर शेतकर्‍यांना सावकाराच्या ताब्यातल्या जमिनी मिळण्यास मदत होईल. मात्र सरकार आणि विरोधीपक्ष या कायद्याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 02:55 PM IST

सावकारग्रस्त शेतकर्‍यांना स्वाभिमानी संघटनेचा मदतीचा हात

27 जून

विदर्भातील शेतकर्‍यांच्या जमिनी आजही सावकर्‍यांच्या ताब्यात आहेत. ह्या सावकरांच्या ताब्यातल्या जमिनी शेतकर्‍यांना परत मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटननेने आंदोलन पुकारले आहे. संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष रविकांत तुपकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावकारांच्या विरोधात आंदोलन केलं आहे.

या आंदोलनात सावकाराच्या ताब्यातल्या शेतीचा ताबा घेऊन ह्या जमिनी शेतकर्‍यांच्या ताब्यात देण्याची मोहिम विदर्भात सुरू केली. राज्य सरकार विधानसभेत सावकारी कायदा आणण्याची शक्यता आहे. हा कायदा मंजूर झाला तर शेतकर्‍यांना सावकाराच्या ताब्यातल्या जमिनी मिळण्यास मदत होईल. मात्र सरकार आणि विरोधीपक्ष या कायद्याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close