S M L

माऊलींच्या पालखीने पार केली दिवेघाटाची अवघड वाट

27 जूनज्ञानराज माऊलींच्या पालखी रथाला आज पुणेकरांनी पहाटेच निरोप दिला. आणि मग माऊली निघाले ते सोपानदेवांच्या भेटीला. अर्थात सासवड मुक्कामाला. या वाटेदरम्यानच लागते ती पालखी प्रवासाची अवघट वाट अर्थात दिवे घाट. दिवेघाटाची अवघड वाट माऊलींच्या जयघोषात वारकरी पार करत होते. तेव्हा थकवा तर सोडाच पण, द्विगुणित उत्साहान वारकरर्‍यांनी घाटाची वाट पार केली. सुरुवातीच्या 27 दिंड्यांनी घाट वाट पार केली. आणि नंतर मानाच्या अश्वांच्या टापा या घाटवाटेनं ऐकल्या. ही सलामी झाल्यानंतर प्रचंड उत्सुकता लागली ती पालखी रथाची. आणि माऊली माऊलींच्या प्रचंड जयघोषात मग झळाळणारा रथ घाटाच्या ऐन मध्यावर आला. तेंव्हा आनंदाची, उत्कटतेची एक लहरच वारकर्‍यांमध्ये पसरली. मिळमिळीत अवघे टाकावेचं तत्त्व ध्यानी घेत, भक्तीच्या भव्यतेच्या ध्यास घेतलेल्या संप्रदायाच्या या मानकर्‍यांनी मग ज्ञानोबारायांना दिवे घाटाची अवघड वाट पार करून दिली. तेव्हा आसमंतात ज्ञानराज माऊली तुकारामाचा गजरच फक्त निनादत होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 27, 2011 06:08 PM IST

माऊलींच्या पालखीने पार केली दिवेघाटाची अवघड वाट

27 जून

ज्ञानराज माऊलींच्या पालखी रथाला आज पुणेकरांनी पहाटेच निरोप दिला. आणि मग माऊली निघाले ते सोपानदेवांच्या भेटीला. अर्थात सासवड मुक्कामाला. या वाटेदरम्यानच लागते ती पालखी प्रवासाची अवघट वाट अर्थात दिवे घाट. दिवेघाटाची अवघड वाट माऊलींच्या जयघोषात वारकरी पार करत होते. तेव्हा थकवा तर सोडाच पण, द्विगुणित उत्साहान वारकरर्‍यांनी घाटाची वाट पार केली.

सुरुवातीच्या 27 दिंड्यांनी घाट वाट पार केली. आणि नंतर मानाच्या अश्वांच्या टापा या घाटवाटेनं ऐकल्या. ही सलामी झाल्यानंतर प्रचंड उत्सुकता लागली ती पालखी रथाची. आणि माऊली माऊलींच्या प्रचंड जयघोषात मग झळाळणारा रथ घाटाच्या ऐन मध्यावर आला. तेंव्हा आनंदाची, उत्कटतेची एक लहरच वारकर्‍यांमध्ये पसरली. मिळमिळीत अवघे टाकावेचं तत्त्व ध्यानी घेत, भक्तीच्या भव्यतेच्या ध्यास घेतलेल्या संप्रदायाच्या या मानकर्‍यांनी मग ज्ञानोबारायांना दिवे घाटाची अवघड वाट पार करून दिली. तेव्हा आसमंतात ज्ञानराज माऊली तुकारामाचा गजरच फक्त निनादत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2011 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close