S M L

हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार

28 जूनपक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार आहे. हरियालच्या जागी रानपिंगळा या पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने हरियालला बदलून रानपिंगळ्याला राज्यपक्षाचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर वन्यजीव संरक्षण सल्लागार मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हरियाललाच राज्यपक्षी म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय झाला. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 05:51 PM IST

हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार

28 जून

पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बातमी हरियाल हाच महाराष्ट्राचा राज्यपक्षी राहणार आहे. हरियालच्या जागी रानपिंगळा या पक्षाला राज्यपक्षाचा दर्जा देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने हरियालला बदलून रानपिंगळ्याला राज्यपक्षाचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

या प्रस्तावावर वन्यजीव संरक्षण सल्लागार मंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हरियाललाच राज्यपक्षी म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय झाला. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close