S M L

भारत-विंडीज दुसरी टेस्ट ; टीम इंडियाचं पारडं जड

28 जूनभारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची दुसरी टेस्ट मॅच आजपासून सुरु होत आहे. बार्बाडोसच्या किंग्जस्टन ओव्हल मैदानावर ही मॅच रंगणार आहे. ही टेस्ट मॅच जिंकत सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे.भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची दुसरी मॅच बार्बाडोसमध्ये खेळवली जाणार आहे आणि टीममधल्या दिग्गज क्रिकेटपटूंनी याआधी बार्बाडोसमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. पण या मैदानावर भारतीय टीमला अद्याप एकही मॅच जिंकता आलेली नाही.जमैकामधील पहिली टेस्ट साडेतीन दिवसातच जिंकल्याने बार्बाडोसला येताना भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढला. पण काही समस्या टीमसमोर कायम आहेत. टीमला चांगली ओपनिंग मिळत नाही. त्यातच दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये तीन फास्ट बॉलर खेळवण्याचा विचार धोणीने बोलून दाखवला. मुनाफ पटेल किंवा अभिमन्यु मिथूनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे स्पीन बॉलर अमित मिश्राला दुसर्‍या टेस्टमध्ये टीमबाहेर बसावं लागेल असं दिसतंय. दुसर्‍या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा असणार आहेत त्या हरभजन सिंगवर. टेस्टमध्ये 400 विकेटचा टप्पा गाठण्यापासून हरभजन केवळ चार विकेट दूर आहे. आणि अशी कामगिरी केल्यास तो चारशेहून अधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा बॉलर ठरणार आहे.यजमान विंडीज टीमनेही दुसर्‍या टेस्ट मॅचसाठी बदलाचे संकेत दिले आहे. टीमचा व्हाईस कॅप्टन ब्रँडन नॅशला खराब फॉर्ममुळे दुसर्‍या टेस्टमध्ये डच्चू देण्यात आला. पण चांगल्या फॉर्ममध्ये असणार्‍या ख्रिस गेलला मात्र अजूनही टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही.भारतीय टीम आणखी एक सीरिज विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर विंडीज टीमसमोर घरच्या मैदानावर सीरिज वाचवण्याचे आव्हान असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 12:28 PM IST

भारत-विंडीज दुसरी टेस्ट ; टीम इंडियाचं पारडं जड

28 जून

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची दुसरी टेस्ट मॅच आजपासून सुरु होत आहे. बार्बाडोसच्या किंग्जस्टन ओव्हल मैदानावर ही मॅच रंगणार आहे. ही टेस्ट मॅच जिंकत सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे.

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानची दुसरी मॅच बार्बाडोसमध्ये खेळवली जाणार आहे आणि टीममधल्या दिग्गज क्रिकेटपटूंनी याआधी बार्बाडोसमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला. पण या मैदानावर भारतीय टीमला अद्याप एकही मॅच जिंकता आलेली नाही.

जमैकामधील पहिली टेस्ट साडेतीन दिवसातच जिंकल्याने बार्बाडोसला येताना भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढला. पण काही समस्या टीमसमोर कायम आहेत. टीमला चांगली ओपनिंग मिळत नाही. त्यातच दुसर्‍या टेस्ट मॅचमध्ये तीन फास्ट बॉलर खेळवण्याचा विचार धोणीने बोलून दाखवला. मुनाफ पटेल किंवा अभिमन्यु मिथूनला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे स्पीन बॉलर अमित मिश्राला दुसर्‍या टेस्टमध्ये टीमबाहेर बसावं लागेल असं दिसतंय.

दुसर्‍या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा असणार आहेत त्या हरभजन सिंगवर. टेस्टमध्ये 400 विकेटचा टप्पा गाठण्यापासून हरभजन केवळ चार विकेट दूर आहे. आणि अशी कामगिरी केल्यास तो चारशेहून अधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा बॉलर ठरणार आहे.

यजमान विंडीज टीमनेही दुसर्‍या टेस्ट मॅचसाठी बदलाचे संकेत दिले आहे. टीमचा व्हाईस कॅप्टन ब्रँडन नॅशला खराब फॉर्ममुळे दुसर्‍या टेस्टमध्ये डच्चू देण्यात आला. पण चांगल्या फॉर्ममध्ये असणार्‍या ख्रिस गेलला मात्र अजूनही टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही.

भारतीय टीम आणखी एक सीरिज विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर विंडीज टीमसमोर घरच्या मैदानावर सीरिज वाचवण्याचे आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close