S M L

पालकांची फसवणूक करणार्‍या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

28 जूनपालकांची फसवणूक केल्याबद्दल नाशिकमधील ब्रुकलीन बर्डी शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नसताना संचालकांनी पालकांकडून सीबीएससी बोर्डाच्या निकषांनूसार अवाजवी फी आकारली. मात्र, शाळेला बोर्डाची मान्यता नसल्याचे पालकांनी माहितीच्या अधिकारातून सिद्ध केलं. त्यामुळेच इंदिरानगर पोलिसांना शाळेविरोधात गुन्हा दाखल करणे भाग पडले आहे. इंदिरा नगर पोलीस स्टेशनमध्ये शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शाळेला बंदोबस्त देण्याची तत्परता दाखवली. आयबीएन लोकमतने संचालकांची बाजू विचारली असता त्यांने पळ काढला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 10:51 AM IST

पालकांची फसवणूक करणार्‍या संचालकांविरोधात गुन्हा दाखल

28 जून

पालकांची फसवणूक केल्याबद्दल नाशिकमधील ब्रुकलीन बर्डी शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या शाळेला सीबीएससी बोर्डाची मान्यता नसताना संचालकांनी पालकांकडून सीबीएससी बोर्डाच्या निकषांनूसार अवाजवी फी आकारली. मात्र, शाळेला बोर्डाची मान्यता नसल्याचे पालकांनी माहितीच्या अधिकारातून सिद्ध केलं.

त्यामुळेच इंदिरानगर पोलिसांना शाळेविरोधात गुन्हा दाखल करणे भाग पडले आहे. इंदिरा नगर पोलीस स्टेशनमध्ये शाळेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शाळेला बंदोबस्त देण्याची तत्परता दाखवली. आयबीएन लोकमतने संचालकांची बाजू विचारली असता त्यांने पळ काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close